नवरदेवाच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरीने लग्न करण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:27 AM2023-03-21T09:27:43+5:302023-03-21T09:27:52+5:30
Bride Groom Jaimala Ceremony : नवरीने नवरदेवाच्या मित्राच्या कृत्यामुळे लग्न करण्यास नकार दिला. नवरीने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा वरात पोहोचली होती आणि हारही टाकून झाले होते. पण नवरदेवाच्या मित्राचं गैरवर्तन महागात पडलं.
Bride Groom Jaimala Ceremony : जेव्हाही कुणाचं लग्न ठरतं तेव्हा नातेवाईकांना लग्नात बोलवलं जातं. नवरदेव आपल्या खास मित्रांना लग्नात बोलवतो. पण जर याच मित्रामुळे लग्न मोडलं किंवा नवरीने लग्न करण्यास नकार दिला तर? बिहारच्या आरा जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. नवरीने नवरदेवाच्या मित्राच्या कृत्यामुळे लग्न करण्यास नकार दिला. नवरीने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा वरात पोहोचली होती आणि हारही टाकून झाले होते. पण नवरदेवाच्या मित्राचं गैरवर्तन महागात पडलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाचं आयोजन धडाक्यात आणि आनंदाने केलं जात होतं. नवरदेव सुद्धा वरात घेऊन लग्न मंडपात पोहोचला होता. इंडिया टुडे न्यूजनुसार, एका लॉनमध्ये लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. 15 मार्चला रात्री 11 वाजता वरात आली. नवरी-नवरदेव स्टेजवर पोहोचले.
यावेळी इथे जे झालं त्यामुळेच हे लग्न मोडलं. नवरदेवाचा एक मित्र स्टेजवर पोहोचला आणि नवरीचा हात पकडून स्टेजवर डान्स करू लागला.
नवरीला डान्स करण्यासाठी फोर्स केला. नवरीला हे अजिबात आवडलं नाही आणि या गोष्टीमुळे निराश होऊन नवरीने लगेच लग्न थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे दोन्हीकडील लोकांमध्ये वाद पेटला. वाद इतका वाढला की, नवरीने लग्न करण्यास नकार दिला.
कुटुंबियांनी नवरीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी नवरदेवाला आपली वरात घेऊन माघारी जावं लागलं. आता दोन्ही परिवार पुन्हा एकत्र येऊन लग्न करण्याचा विचार करत आहेत. पण अजून नवरी किंवा नवरदेवाकडून यावर काही सांगण्यात आलं नाही.