लग्नात नवरदेवाला शाहरूख खान बननं पडलं महागात, नवरीने पाठवलं त्याला तुरूंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:24 AM2023-03-14T11:24:12+5:302023-03-14T11:24:29+5:30
लग्नात आलेले लोक नवरदेवाच्या डोक्यात फरक असल्याचं बोलले. ज्यानंतर मुलीकडील आणि मुलाकडील लोक आमने-सामने आले.
उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील कोपागंजमध्ये रविवारी एका तरूणीच्या लग्नासाठी वरात आली होती. वरात आल्यावर मुलीकडील लोकांनी त्यांचं स्वागत केलं. रात्री वेगवेगळे रितीरिवाज पार पडले. हार घालण्याचा रिवाज करण्यासाठी नवरी स्टेजवर आली आणि तिला पाहून नवरदेव विचित्र वागू लागला. नवरीला पाहून नवरदेव अचानक शाहरूख खानचे डायलॉग बोलू लागला. नवरदेव स्टेजवर आला आणि लोकांच्या मनोरंजनासाठी तो शाहरूख खानची अॅक्टिंगही करू लागला. हे पाहून नवरी चांगलीच संतापली आणि तिने थेट लग्न करण्यास नकार दिला. नंतर पोलिसांना बोलवण्यात आलं आणि नवरदेवला पोलीस आपल्यासोबत घेऊन गेले.
असं सांगण्यात आलं की, नवरीला बघून नवरदेवाने डायलॉग मारला की, 'मरते दम तक लेकर जाउंगा दुल्हन, मांग में सिंदूर भी डालूंगा. आशिक हूं मैं, कातिल भी हूं, सबके दिलों में राज करने वाला भी हूं, मैं वादों से मैं मुखरता नहीं मरने से डरता नहीं'. यानंतर मुलीकडील लोकांना वाटलं की, नवीन जावई एखाद्या गोष्टीमुळे नाराज झाला असेल. त्यामुळे त्याला समजावण्यातही आलं. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर लग्नात गोंधळ सुरू झाला.
लग्नात आलेले लोक नवरदेवाच्या डोक्यात फरक असल्याचं बोलले. ज्यानंतर मुलीकडील आणि मुलाकडील लोक आमने-सामने आले. यादरम्यान नवरदेव अचानक स्टेजवर गेला आणि तिथे उपस्थित लोकांना धमकी देऊ लागला होता.
पोलिसांचं नाव ऐकताच नवरदेव म्हणाला की, पोलिसांना बोलवा किंवा कुणालाही काही फरक पडत नाही. अनेक तासांच्या गोंधळानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनीही नवरदेवाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासमोरही तो लोकांना धमकी देऊ लागला होता. पोलिसांनी नवरदेव, त्याचे भाऊ आणि नवरीच्या भावांना ताब्यात घेतलं आहे.