...म्हणून नवरदेवाचा मेट्रो प्रवास; भाजपा आमदार म्हणाले, देवाभाऊंनी शब्द पाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 05:22 PM2024-01-15T17:22:48+5:302024-01-15T17:23:13+5:30
या नवरदेवाच्या मेट्रो प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मुंबई - शहरातील वाहतूक कोंडीत अनेकदा तासनतास वाहनचालकांना ताटकळत बसावं लागतं. वाहतूक कोंडीचा अनुभव प्रत्येक मुंबईकराने घेतला असेल. नुकतेच एका प्रसिद्ध उद्योगपतीनेही वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा लोकलनं प्रवास केलेला पाहिला. तसाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे मुंबईतील एका नवरदेवाचा, ज्याच्या लग्नाचा मुहूर्त चुकू नये यासाठी बँड, बाजा, बारातीसह म्हणजे नवरदेवाने त्याच्या कुटुंबासह मेट्रोनं प्रवास केला आहे.
या नवरदेवाच्या मेट्रो प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ट्विट करून भाजपा आमदार श्वेता महाले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. श्वेता महाले यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मुंबईत कुठेही फक्त ५९ मिनिटांमध्ये प्रवासासाठी रस्ते - महामेट्रोचं जाळं निर्माण करण्याचा शब्द देवाभाऊंनी दिलाय. त्याचीच प्रचिती तसेच एक गोड असा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहावयास मिळाला. महामेट्रोमुळे जसा नवरोबाचा मुहूर्त चुकला नाही अगदी त्याचप्रमाणे मोदींच्या नेतृत्वात देवाभाऊंनी सर्वसामान्य जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाचा मुहूर्त देखील कधीच चुकणार नाही असा विश्वास सर्व महाराष्ट्रवासियांना आहे अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
मुंबईत कुठेही फक्त ५९ मिनीटांमध्ये प्रवासासाठी रस्ते - महामेट्रोचं जाळं निर्माण करण्याचा शब्द देवाभाऊंनी दिलाय. त्याचीच प्रचिती तसेच एक गोड असा अनुभव सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहावयास मिळाला. महामेट्रोमुळे जसा नवरोबाचा मुहूर्त चुकला नाही अगदी त्याचप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात… pic.twitter.com/O8Mwdu0NB0
— Shweta Mahale Patil . (@MLAShwetaMahale) January 15, 2024
काय आहे हा व्हिडिओ?
इन्स्टाग्रामवर Abhishhashtra by shillparaje नावाच्या यूजरने हा व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट केला. त्यात त्यांनी मुंबई मेट्रोचे आभारी मानत म्हटलंय की, पश्चिम उपनगरात असणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे माझा पुतण्या आणि आम्हाला मुहूर्त गाठणे कठीण होते. त्यामुळे आम्ही तातडीने मेट्रोने प्रवास करायचा निर्णय घेतला आणि अगदी वेळेत आम्ही विवाहस्थळी पोहचलो असं त्यांनी लिहिलं. हा व्हिडिओ जवळपास ४ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला. त्याचसोबत अनेकांनी व्हिडिओत कमेंट करून नवरदेव वेळेत पोहचल्याबद्दल त्याचं अभिनंदन केले आहे. त्याचसोबत बऱ्याच जणांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.