Guinness Book: आठवड्यातील 'हा' दिवस सर्वात वाईट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 07:01 PM2022-10-17T19:01:34+5:302022-10-17T19:02:38+5:30

Worst Day Of Week: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डके सर्वात वाईट दिवस कोणता, याबाबत माहिती दिली आहे.

Guinness Book: monday is Worst Day of the Week; Recorded in the Guinness Book of World Records | Guinness Book: आठवड्यातील 'हा' दिवस सर्वात वाईट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Guinness Book: आठवड्यातील 'हा' दिवस सर्वात वाईट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Next

Guinness Book Of World Records: कोणतेही काम करण्यापूर्वी, विशेषत: भारतातील लोक चांगल्या दिवस पाहतात. काहीजण सोमवार, काहीजण गुरुवार किंवा इतर कोणताही दिवस उत्तम मानून ते आपले काम सुरू करतात. पण अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या रेकॉर्ड बुकमध्ये आठवड्यातील सोमवारची सर्वात वाईट दिवस म्हणून नोंद झाली आहे.

सोमवार सर्वात वाईट दिवस
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आज म्हणजेच सोमवारी ट्विट करून लोकांना आश्चर्यचकित केले आणि आठवड्यातील सर्वात वाईट दिवस कोणता, हे सांगितले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आम्ही सोमवार, या दिवसाची आठवड्यातील सर्वात वाईट दिवस म्हणून नोंद करत आहोत.'


गिनीज बुकने असे का म्हटले?
सोमवारचा क्रमांक शनिवार आणि रविवार नंतर येतो, म्हणजे दोन सुट्ट्यांनंतर येतो. या दिवशी लोकांना ऑफिस किंवा इतर कामाच्या ठिकाणी जाण्यात आळस जाणवतो. इतकेच नाही तर अनेक वेळा सोशल मीडियावर लोक लिहितात की सोमवार हा सर्वात वाईट दिवस आहे. हे लक्षात घेऊन गिनीज बुकने या दिवसाची नोंद केली आहे.

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया
या ट्विटनंतर जगभरातील ट्विटर यूजर्स यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण म्हणत आहेत की, गिनीज बुकने एकदम बरोबर निर्णय घेतला. तर, काहीजण म्हणत आहेत, गिनीज बुकने लोकांच्या मनातील भावना ओळखल्या. दरम्यान, गिनीज बुकने हे ट्विट मस्करीत केले आहे. 

Web Title: Guinness Book: monday is Worst Day of the Week; Recorded in the Guinness Book of World Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.