या जुळ्या बहिणींनी केलेला विश्वविक्रम पाहुन तुम्ही व्हाल अवाक्! जागतिक महायुगद्धाच्या होत्या साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 06:30 PM2021-09-22T18:30:26+5:302021-09-22T18:31:02+5:30

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जपानमधील दोन बहिणींना दिर्घायुष्याचा विक्रम करणाऱ्या जुळ्या वयोवृद्ध म्हणून गौरव केला. उमेनो सुमियामा (Umeno Sumiyama) आणि कोइमे कोदामा (Koume Kodama) अशी या या जुळ्या बहिणींची नावं असून त्यांचे वय १०७ आहे. 

Guinness book of world record awards twins sisters of Japan who are 107 years 300 days old | या जुळ्या बहिणींनी केलेला विश्वविक्रम पाहुन तुम्ही व्हाल अवाक्! जागतिक महायुगद्धाच्या होत्या साक्षीदार

या जुळ्या बहिणींनी केलेला विश्वविक्रम पाहुन तुम्ही व्हाल अवाक्! जागतिक महायुगद्धाच्या होत्या साक्षीदार

Next

जपानी लोक दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध आहेत. नुकताच जपानमध्ये दिर्घायुष्याच्या बाबतीत एका नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जपानमधील दोन बहिणींना दिर्घायुष्याचा विक्रम करणाऱ्या जुळ्या वयोवृद्ध म्हणून गौरव केला. उमेनो सुमियामा (Umeno Sumiyama) आणि कोइमे कोदामा (Koume Kodama) अशी या या जुळ्या बहिणींची नावं असून त्यांचे वय १०७ आहे. 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांचं वय १०७ वर्ष ३०० दिवस होतं. उमेनो आणि कोइमे यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९१३ मध्ये जपानमधील शोडो आयलॅण्ड (Shodo Island) येथे झाला. त्यांच्या कुटुंबात १३ सदस्य होते. या दोन्ही बहिणी सकारात्मक विचारसरणीच्या असून, त्या कधीही चिंता करत नाहीत. असं या दोघींच्या कुटुंबीयांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना सांगितलं. या दोन बहिणी म्हणाल्या की, शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही लग्न होऊन वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलो. उमेनो यांच लग्न आयलँड मधीलच एका व्यक्तीशी झालं तर कोइमे यांच लग्न आयलँडमधील बाहेरच्या व्यक्तीशी झालं.

जागतिक महायुद्ध (World War) आम्ही अगदी जवळून अनुभवलं, असं या दोघी बहिणी नमूद करतात. "दुसऱ्या महायुद्धादरम्यान मला माझं घर सोडावं लागलं. कारण तिथं हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी आश्रयस्थान उभारण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू युद्ध थांबलं", असं उमेनो यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, "एक वेळ अशी होती की आम्ही एकमेकींपासून फक्त ३०० मीटरच्या अंतरावर राहायचो पण फक्त लग्नसमारंभातच भेटायचो" 

कोइमे म्हणाल्या की त्यांच स्वप्न होतं की त्यांच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यावं पण त्यांना कल्पनाही नसेल की त्यांच स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. रिपोर्टनुसार आता त्यांची स्मृती कमकुवत झाली आहे. त्यांना हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा किताब काय आहे हे समजत नाहीये. दोघीही आता वृद्धाश्रमात राहतात.

 

Web Title: Guinness book of world record awards twins sisters of Japan who are 107 years 300 days old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.