खात्यात चुकून आले 11 हजार कोटी; डोकं लावलं अन् 'त्याने' 30 मिनिटांत कमावले 5.64 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 03:32 PM2022-09-17T15:32:49+5:302022-09-17T15:40:19+5:30
एका व्यावसायिकाच्या डिमॅट अकाऊंटमध्ये हजारो किंवा लाखो रुपये नव्हे तर चुकून 11,677 कोटी रुपये आले. यानंतर त्याने डोकं लावलं आणि या रकमेतून दोन कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आणि लाखो रुपये कमावले.
शेअर बाजार हे एक असं ठिकाण आहे जिथे गुंतवणूकदार पैसे कमवतात आणि गमावतात, परंतु पैशाशिवाय क्वचितच कोणी करोडपती बनतो. अशीच एक हैराण करणारी घटना आता समोर आली आहे. 26 जुलै रोजी गुजरातमधील एका व्यावसायिकाच्या डिमॅट अकाऊंटमध्ये हजारो किंवा लाखो रुपये नव्हे तर चुकून 11,677 कोटी रुपये आले. यानंतर त्याने डोकं लावलं आणि या रकमेतून दोन कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आणि लाखो रुपये कमावले.
संयमाने आणि हुशारीने केलं काम
अहमदाबादचे स्टॉक ट्रेडर रमेश भाई सागर यांच्यासोबत ही घटना घडली आहे. त्यांनी कोटक सिक्युरिटीजमध्ये डिमॅट अकाऊंट उघडले होते. 26 जुलै 2022 रोजी रमेश यांच्या डिमॅट खात्यात अचानक 11,677 कोटी रुपये आले. मात्र, काही तासांतच खात्यातील पैसे काढण्यात आले. या स्टॉक ट्रेडरमध्ये, त्यांनी संयमाने आणि समजूतदारपणाने काम केले आणि स्टॉक मार्केटमध्ये 2 कोटी रुपये गुंतवले, ज्यामुळे त्याला 30 मिनिटांत 5.64 लाख रुपयांचा नफाही झाला.
"मी झटपट निर्णय घेतो, त्यामुळे मला फायदा झाला"
भास्करला दिलेल्या मुलाखतीत रमेश भाई सागर म्हणाले – "मी लगेच निर्णय घेतो, त्यामुळे मला फायदा झाला. 26 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता नेहमीप्रमाणे व्यवहार करण्यासाठी बसलो होतो. दोन-तीन व्यवहार केले, पण त्या दिवशी बाजारात फारशी हालचाल नव्हती. नंतर 11.30 पर्यंत थांबलो. अचानक मी बॅलेन्स तपासला तेव्हा मला धक्का बसला. माझ्या खात्यात 11,677 कोटी रुपये आले होते."
"शेअर मार्केटचे ज्ञान होते त्यामुळे मला भीती वाटली नाही"
"अकाऊंटमध्ये जमा झालेल्या पैशातून मी बँक निफ्टी कॉल-पुटमध्ये सुमारे 2 कोटींचा व्यवहार केला. त्यावेळी रुपया शेअर मार्केटमध्ये गुंतवताना मला एकदा तोट्याचा विचार आला, पण मला शेअर मार्केटचे ज्ञान होते त्यामुळे मला फारशी भीती वाटली नाही. माझा एक मित्र शेअर बाजाराचा व्यवसाय करायचा. शेअर बाजारात थोडी गुंतवणूक केली तर बरे होईल, असं तो म्हणाला. त्यानंतर 4-5 वर्षे मी शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करतो" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.