बोंबला! व्यापाऱ्याने मुलाच्या लग्नात छापलं ४ किलो वजनाचं इन्विटेशन कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 05:00 PM2021-11-12T17:00:31+5:302021-11-12T17:06:00+5:30

सध्या सोशल मीडियावर गुजरातच्या एका व्यापाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. व्यापारी मुलेशभाई उकनी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात ४ किलो वजनाचं कार्ड छापलं आहे.

Gujarati businessman's son wedding invitation card goes viral on social media | बोंबला! व्यापाऱ्याने मुलाच्या लग्नात छापलं ४ किलो वजनाचं इन्विटेशन कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्

बोंबला! व्यापाऱ्याने मुलाच्या लग्नात छापलं ४ किलो वजनाचं इन्विटेशन कार्ड, किंमत वाचून व्हाल अवाक्

Next

भारतात लोक लग्न समारंभात भरपूर पैसे खर्च करतात. त्यात श्रीमंत पार्टी असेल तर मग बघायलाच नको. भारतात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे तुम्हाला बॅन्ड-डीजेचा आवाज येत असेल. अशात श्रीमंत लोक आपल्या घरातील लग्न इतक्या धडाक्यात करतात की, वर्षभऱ त्याची चर्चा सुरू असते. सध्या सोशल मीडियावर गुजरातच्या एका व्यापाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. व्यापारी मुलेशभाई उकनी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात ४ किलो वजनाचं कार्ड छापलं आहे. या कार्ड चर्चा सगळीकडे होत आहे.

हलक्या गुलाबी रंगाचं हे कार्ड फारच सुंदर आहे. हे एखाद्या बॉक्ससारखं आहे. ते उघडल्यावर मखमलच्या कापडात चार छोटे बॉक्स दिसतात. या बॉक्सेसमध्ये ड्राय फ्रूट टाकलं आहे. या कार्डच एकूण वजन ४ किलो दोनशे ऐंशी ग्रॅम इतकं आहे. एका कार्डची किंमत ७ हजार रूपये सांगितलं जात आहे. कार्डमध्ये एकूण ७ पानं आहेत. यात तीन दिवसांच्या लग्नाचे सगळे डिटेल्स दिले आहेत. कार्डच्या बॉक्समध्ये काजू, किशमिश, बदाम आणि चॉकलेट टाकले आहे. हे लग्न राजस्थानच्या जोधपूरमध्ये १४ नोव्हेंबरला होणार आहे.

कार्डमध्ये सर्वातआधी द्वारकाधीशच्या कृष्णजींचा फोटो आहे. मुलेशभाई उकनी आणि त्यांच्या परिवाराची कान्हाजीमध्ये आस्था आहे. त्यामुळे कार्डवर त्यांचा फोटो छापला. या लग्नाच्या कार्डची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लोकांमध्येही उत्सुकता आहे की, कार्ड इतकं मोठं आहे तर समारंभ किती मोठा असेल. मुलेशभाई उकनी द्वारका मंदिराचे ट्रस्टी आहेत. 
 

Web Title: Gujarati businessman's son wedding invitation card goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.