मुकी जनावरं उपाशी राहू नयेत; म्हणून 'हा' रोज करतोय २० किलोमीटर प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 03:57 PM2020-05-06T15:57:34+5:302020-05-06T16:10:29+5:30
कोरोना महामारीच्याआधी बचत केलेले पेसे वापरून मुक्या जनावरांना रोज खाद्य पुरवतो
माणूस असो किंवा मुकी जनावरं भूक सगळ्यांनाच लागते. लॉकडाऊनदरम्यान भूक भागवण्याासाठी मदत करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गरजवंताना मदतीचा हात देत आहेत. तर काही पोलीस कर्मचारी लोकांचे अन्नदाता तर काही ठिकाणी देवदूत बनून आपलं कर्तव्य करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबाबत सांगणार आहोत.
सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असताना केरळमधील चांगनाचेरी या गावातील एक तरूण रोज वीस किलोमीटर प्रवास करत आहे. २० किलोमीटर प्रवास करण्याचं कारण असं की मुक्या जनावरांना उपाशी राहावं लागू नये. हा त्यामागचा उद्देश आहे. २४ वर्षीय अर्जुन गोपी नेहमी गरीबांची मदत करत असताे. हा तरूण एका स्थानिक कम्यूनिटी किचनमध्ये असल्यामुळे गरजवंताना जेवणं पुरवण्याचे काम तो करतो. घरातून निघत असताना बिस्कीटांनी भरलेली बॅग सोबत घेऊन हा प्रवासाला सुरूवात करतो.
माध्यमांशी बोलताना अर्जुन यांने सांगितलं की, ''आधी मला प्राण्याबद्दल फारसा जिव्हाळा नव्हता. कम्यूनिटी किचनमध्ये सहभागी झाल्यानंतर गरीब लोकांना जेवणाचे पॅकेट्स वाटत असताना मी एका कुत्र्याच्या पिल्लाला रोज पाहायचो. एके दिवशी ते कुत्र्याचं पिल्लू मला मेलेल्या अवस्थेत दिसून आलं. पण या कुत्र्याच्या अंगावर कोणतीही जखम नव्हती त्यावरून माझ्या लक्षातआलं की, कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू उपासमारीमुळे झाला आहे. त्यानंतर मी मुक्या जनावरांची मदत करायचं ठरवलं.'' (हे पण वाचा-मित्रांच्या सांगण्यावरून १०० किमी सायकल चालवून बायकोला आणायला गेला; मग झालं असं काही)
अर्जुनने या मुक्या जनावरांना खायला देण्याच्या मोहिमेची सुरूवात १३ एप्रिलपासून केली. कोरोनाच्या महामारीच्या आधी बचत केलेल्या पैश्याचा वापर करून मुक्या जनावरांना रोज खाद्य पुरवत असल्याचे अर्जुनने सांगितले. (हे पण वाचा-आली रे आली! सोशल डिस्टेंसिंगची बाईक आली, फोटो पाहताच व्हायरल झाली...)