'या' देशांमध्ये हेअर कटिंग कराल तर व्हाल कंगाल, पाहा यादी; भारताचा कितवा नंबर..?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:59 PM2023-07-07T14:59:42+5:302023-07-07T15:00:34+5:30
Hair Cutting Charges: वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये विविध देशातील हेअर कटिंगचे दर सांगितले आहेत.
Hair Cutting Charges: आजकाल प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये एकापेक्षा एक ब्रँडेड हेअर कटिंग सलून सुरू होत आहेत. पूर्वी केस कापण्यासाठी फार कमी पैसे लागायचे, पण बे ब्रँडेड सलून आल्यामुळे हेअर कटिंगचे भावही वाढले आहेत. विविध देशांमध्ये कटिंगचे विविध दर आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे केस कापण्याचे दर ऐकून तुम्ही थक्क व्हाल. त्या देशांमध्ये केस कापून तुमचा खिसा रिकामा होईल.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सने एक रिपोर्ट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विविध देशात केस कापण्याची दर किती आहेत, हे सांगण्यात आले आहे. नॉर्वेमध्ये केस कापण्याचे दर सर्वाधिक $64.60 म्हणजेच जवळपास रु 5325 आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सच्या अहवालात हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर जपानचे नाव येते. जपानमध्ये मुलांचे केस कापण्यासाठी सरासरी 56 डॉलर्स म्हणजे सुमारे 4316 रुपये घेतले जातात.
Men’s haircut price:
— World of Statistics (@stats_feed) July 5, 2023
🇳🇴 Norway: $64.60
🇯🇵 Japan: $56.00
🇩🇰 Denmark: $48.21
🇸🇪 Sweden: $46.13
🇦🇺 Australia: $46.00
🇺🇸 USA: $44.00
🇨🇭 Switzerland: $42.96
🇫🇷 France: $37.05
🇰🇷 South Korea: $36.94
🏴 England: $35.74
🇩🇪 Germany: $35.39
🇦🇹 Austria: $35.06
🇫🇮 Finland: $31.03
🇮🇪…
या यादीत डेन्मार्क तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे केस कापण्याचे शुल्क 48.21 डॉलर्स म्हणजेच सुमारे 3973 रुपये आहे. या यादीत स्वीडन चौथ्या क्रमांकावर आहे. येथे केस कापण्यासाठी सरासरी $ 46.13 म्हणजेच सुमारे 3967 रुपये मोजावे लागतात. या अहवालात अमेरिका सातव्या क्रमांकावर आहे. येथे केस कापण्याचे शुल्क 44 डॉलर म्हणजे सुमारे 3626 रुपये आहे.
भारत तिव्या क्रमांकावर ?
जर आपण भारताबद्दल बोललो तर, येथे केस कापण्यासाठी $ 5.29 म्हणजेच सुमारे 436 रुपये मोजावे लागतात. या यादीत भारत 35व्या स्थानावर आहे. भारतानंतर पाकिस्तानचे नाव या यादीत आहे. पाकिस्तान 36 व्या क्रमांकावर आहे. येथे केस कापण्यासाठी सरासरी $ 4.44 म्हणजेच सुमारे 365 रुपये खर्च करावे लागतात.