तरूणीने मेसेजमध्ये चुकून Conditioner च्या जागी लिहिलं Condom, वडिलांनी पाहिला मेसेज आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:24 PM2021-06-21T12:24:31+5:302021-06-21T12:29:42+5:30
इंग्लंडच्या लिंकनशायरच्या क्लीथॉर्प्सची राहणारी ३४ वर्षीय कर्स्टी मॅकीने आपल्या आईला मेसेज केला आणि कंडीशनर आणायला सांगितलं.
कधी कधी घाईत आपण चुकून असे काही मेसेज पाठवतो की, ज्यामुळे अर्थाचा बेअर्थ होतो. कधी कधी तर आपण अंदाजही लावत नाही असा गोंधळ होतो. असंच काहीसं एका तरूणीसोबत झालं. इंग्लंडच्या लिंकनशायरच्या क्लीथॉर्प्सची राहणारी ३४ वर्षीय कर्स्टी मॅकीने आपल्या आईला मेसेज केला आणि कंडीशनर आणायला सांगितलं.
द सनच्या रिपोर्टनुसार, कर्स्टीने आपल्या आईला कंडीशनर आणण्यासाठी सांगितलं. पण प्रिडिक्टिव टेक्स्टमुळे टाइप करताना कंडीशनरच्या जागी कंडोम असं टाइप झालं. कर्स्टीने सांगितलं की, 'माझे बाबा किचनमध्ये होते. तिथे आईचा फोन चार्जिंगला लावलेला होता आणि त्यांनी माझा मेसेज वाचला. यानंतर त्यांनी मला प्रॉस्टिट्यूट समजलं. ते धावत दुसऱ्या रूममध्ये गेले आणि आईला ही बाब सांगितली.
कर्स्टी मॅकीने सांगितलं की, मेसेज पाठवल्यानंतरही मला मी केलेल्या चुकीबाबत लक्षात आलं नाही. आणि आईने मला सांगितलं की, बाबांनी माझे मेसेज वाचले तेव्हा त्यांना मी प्रॉस्टिट्यूट वाटले. तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं. (हे पण वाचा : दोन तरूणींना एकाचवेळी डेट करत होता तरूण, दोघींनाही ते समजलं आणि मग...)
कर्स्टी मॅकीने सांगितलं की मेसेजमध्ये लिहिलं होतं की, 'आई तू सकाळी कंडोम आणू शकते का? माझ्याकडील संपलं आहे आणि सकाळी माझ्याकडे ग्राहक येणार आहेत'. तिने सांगितलं की, प्रिडिक्टिव टेक्स्टमुळे कंडीशनरच्या जागी कंडोम झालं होतं.
कर्स्टी पुढे म्हणाली की, 'माझे वडील फार जुन्या जमान्यातील आहेत आणि हा मेसेज पाहिल्यावर फार गंभीर झाले होते. माझ्यासाठी सुद्धा ही चूक फार लाजिरवाणी होती. सुदैवाने आईने नंतर सगळं क्लिअर केलं आणि माझ्यासाठी कंडीशनर घेऊन आली.