सुट्टी मिळाली नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उरकला महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 12:21 PM2021-04-24T12:21:37+5:302021-04-24T12:21:54+5:30

एक पोलीस कॉन्स्टेबल आशा रोत नवरी होणार आहे. तिचं लग्न ३० एप्रिलला होणार आहे. पण शहरात लागलेल्या लॉकडाऊनमुळे तिला सुट्टी मिळाली नाही.

Haldi ceremony arranged for a female constable at police station as she didnt get leave | सुट्टी मिळाली नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उरकला महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम!

सुट्टी मिळाली नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उरकला महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम!

googlenewsNext

कोरोनामुळे लोकांचं जीवन बदललं आहे. जीवन जगण, घराबाहेर निघणं, जेवणं, लग्न समारंभ साजरे करण्याची पद्धत सगळं काही बदललं आहे. यादरम्यान राजस्थानच्या डुंगरपूर भागातून हळदीचा अनोखा कार्यक्रम बघायला मिळाला. एका तरूणीचा हळदीचा कार्यक्रम घरी नाही तर पोलीस स्टेशनमध्ये होत आहे. इथे काही महिला पोलिसांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला हळद लावली.

एक पोलीस कॉन्स्टेबल आशा रोत नवरी होणार आहे. तिचं लग्न ३० एप्रिलला होणार आहे. पण शहरात लागलेल्या लॉकडाऊनमुळे तिला सुट्टी मिळाली नाही. यादरम्यान आशाचा हळदीचा कार्यक्रम होणार होता. सुट्टी मिळाली नाही तर पोलीस स्टेशनमधील महिला पोलिसांनी तिचा हळदीचा कार्यक्रम करून टाकला. पोलीस स्टेशने इंचार्ज दिलीप दान यांनी सांगितले की, आशाचं गाव हिराता शहरापासून २० किमी अंतरावर आहे. आणि ३० एप्रिलला तिचं लग्न आहे. राजस्थानमध्ये कोरोना वाढत असून आशाची ड्युटीही लागली आहे.

आशाला दिलं सरप्राइज

इंचार्जने सांगितले की, यादरम्यान आम्हाला समजलं की, आशाची हळद आहे आणि ती घरी जाऊ शकत नाहीये. त्यामुळे आम्ही मुहूर्ताच्या हिशेबाने पोलीस स्टेशनमध्येच हळदीची तयारी केली. दिलीप दान चरण यांनी सांगितले की, आम्ही कॉन्स्टेबल आशासाठी सरप्राइज ठेवलं होतं. ती ड्युटी करत होती. आम्ही सर्वांनी तिला सरप्राइज दिलं. सर्व रितीरिवाज व्यवस्थित केले.

गेल्यावर्षी होणार होतं लग्न

पोलीस स्टेशनमध्ये खाट नसल्याने तिला खुर्चीवर बसून वर फेकलं. असा रिवाज असतो. सायंकाळी आशाला सुट्टी मिळाली आणि ती तिच्या घरी निघून गेली. तेच आशाने सांगितले की, तिचं लग्न गेल्यावर्षी मे महिन्यात होणार होतं. मात्र तेव्हा लॉकडाऊन  आणि कोरोनामुळे ते होऊ शकलं नाही. आता तिचं लग्न ३० एप्रिलला होणार आहे.
 

Web Title: Haldi ceremony arranged for a female constable at police station as she didnt get leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.