‘मदर्स डे’च्या शुभेच्छांचा सोशल मीडियावर पाऊस!
By admin | Published: May 11, 2015 02:07 AM2015-05-11T02:07:06+5:302015-05-11T02:07:06+5:30
फेसबूक, व्हॉट्सअप आणि टिष्ट्वटरवर ‘मदर्स डे’च्या शुभेच्छांचा पाऊस पडला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिलसिला रविवारी उशिरापर्यंत सुरूच होता.
मुंबई : फेसबूक, व्हॉट्सअप आणि टिष्ट्वटरवर ‘मदर्स डे’च्या शुभेच्छांचा पाऊस पडला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिलसिला रविवारी उशिरापर्यंत सुरूच होता. यादरम्यान, फेसबूक आणि टिष्ट्वटरवर आपल्या आईसोबतचे फोटोज् अपलोड करून अनेकांनी आईप्रति भावना मांडल्या. तसेच, व्हॉट्सअपवर ‘लव्ह यू आई’ म्हणत अनेकांनी आपले स्टेट्स आणि डीपी अपडेट्स केले. त्यामुळे सगळीकडेच ‘व्हर्च्युअल’ मदर्स डे दणक्यात साजरा झाला.
संपूर्ण जगभरात ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने गुगलनेदेखील एक खास अॅनिमेटेड डुडल बनवले आहे. यात प्राण्यांपासून ते माणसांपर्यंतच्या आई-मुलाचे प्रेम दाखवले आहे. डुडलमध्ये गुगलच्या दुसऱ्या ‘ड’ या ‘ओ’ अक्षरातून एक बदक तयार होते आणि ते आपल्या पिल्लाला पंखात सामावून घेते. त्यानंतर जंगली प्राणी, ससा असा प्रवास करीत शेवटी एक लहान मूल पळत आपल्या आईकडे येते. गुगलच्या या काही सेकंदांच्या डुडलमधूनही आई-मुलाचे निखळ नाते हळुवारपणे उलगडले आहे.
दरम्यान, बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही आपला आईसोबतचा फोटो अपलोड करून तिच्यासोबतीतील आठवणींना उजाळा दिला. शिवाय, टिष्ट्वटरवर ‘हॅप्पी मदर्स डे’, ‘मॉम्स क्नोव्ह बेस्ट’ असे वेगवेगळे ट्रेंड्सही दिसून आले. (प्रतिनिधी)