#HappyNewYearWishes : प्रियजनांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे काही 'मेसेज'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 11:09 AM2017-12-31T11:09:04+5:302017-12-31T11:34:21+5:30
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने एकमेकांना येणऱ्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी असे काही कोट्स आणि मेसेज वापरु करता.
मुंबई : २०१७च्या समारोपाला आता अवघे काही तास बाकी आहेत. अवघ्या काही तासात २०१८ चा सूर्योदय होणार आहे. लोकांचे ३१ डिसेंबरच्या रात्रीचे प्लॅन ठरले आहेत तर काहींचे अजून बाकी आहेत. यादिवसांत लोकं एकमेकांना भेटतात, गप्पा मारतात. एकत्र जेवण करतात, भेटवस्तुंची देवाणघेवाण होते. सरत्या वर्षातील वाईट किंवा कटु गोष्टींना अलविदा करीत लोक येत्या वर्षाला आनंदुन स्वागत करतात.
फटाके फोडले जातात आणि नाच-गात नववर्षाचं स्वागत केलं जातं. आजकाल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा जमाना असल्याने त्यावरुनही दूर-दूरच्या लोकांना शुभेच्छा दिल्या जातात. आम्ही तुमच्यासाठी काही न्यु इअर मेसेज घेऊन आलो आहोत. सोशल मीडियावरुन प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी या मेसेजचा वापर तुम्ही करु शकता. हा दिवस आपण आपल्या जवळच्या लोकांसोबत साजरा करतो. जगभरात हा दिवस साजरा करण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी हेतु एकच असतो. आम्ही अशी आशा करतो की येणारं हे वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन यावं.
सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण जमेल तितक्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. ज्यांच्याशी वर्षभर आपला संपर्क होत नाही त्यांनाही आपण नववर्षाच्या शुभेच्छा देतो. अशातुन काही दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतात. आपल्या कुटूंबांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मित्र परिवारासोबत वेळ घालवला जातो, एकमेकांना भेटवस्तु दिल्या जातात. हॉटेलमध्ये, फार्महाऊसमध्ये किंवा कुणाच्या घरी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला जातो. त्यासाठी बराच पैसा खर्च केला जातो. बरेच दिवस याचे प्लॅनिंग चालु असते.
यादिवशी कोणाविषयी मनात कटुता न ठेवता सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात. प्रत्येकाला नव्या वर्षात सुख, समाधान, संपत्ती आणि निरोगी आयुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त केली जाते. खरंतर इंग्रजी कालगणनेनुसार ही नववर्षाची सुरुवात असते आणि हिंदु वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. मात्र इंग्रजी कालगणना आपल्या दैंनदिन व्यवहाराचा महत्त्वाचा भाग असल्याने हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.
आम्ही आशा करतो की, नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी या इमेजेसची तुम्हाला मदत होईल. त्यात असल्याप्रमाणे खरंच तुम्हा सर्वांना येणारं वर्ष भरभराटीचं आणि प्रगतीचं जावो. तुमच्यापासून दुरावलेली माणसं तुमच्या जवळ येवो. सरत्या वर्षातल्या वाईट गोष्टी ३१ डिसेंबरच्या रात्रीसोबत निघून जावोत आणि १ जानेवारीची पहाट तुमच्या आयुष्यातली सर्वात सुंदर पहाट असो.