शाब्बास! शिक्षण घेऊनही नोकरी नव्हती; प्लास्टीकच्या बाटल्यांपासून शौचालयं बनवतोय 'हा' इंजिनिअर

By Manali.bagul | Published: November 3, 2020 07:25 PM2020-11-03T19:25:32+5:302020-11-03T19:44:20+5:30

Inspirational Stories in Marathi: जतिन गौड यांनी दोन वर्षांपूर्वी आपला इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केला. तरीही त्यांना जॉब मिळाला नव्हता. कुटूंबियांसह जतिन यांनासुद्धा ही गोष्ट खटकत होती.

Haryana engineer making eco bricks reusing plastic bottles to construct india | शाब्बास! शिक्षण घेऊनही नोकरी नव्हती; प्लास्टीकच्या बाटल्यांपासून शौचालयं बनवतोय 'हा' इंजिनिअर

शाब्बास! शिक्षण घेऊनही नोकरी नव्हती; प्लास्टीकच्या बाटल्यांपासून शौचालयं बनवतोय 'हा' इंजिनिअर

googlenewsNext

(image Credit-  The Better India)

प्लास्टीकमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं याची तुम्हाला कल्पना असेलच. त्यामुळे अनेक ठिकाणी प्लास्टीकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पण अनेक ठिकाणी प्लास्टीकच्या बॉट्लस वापर करून सर्रास फेकून दिल्या जातात. याच प्लॅस्टीकचा बाटल्यांचा वापर करून शौचालयं तयार केली जाऊ शकतात असा विचारही तुम्ही कधी केला नसेल. बेटर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार हरियाणातील रहिवासी असलेल्या जतिन गौड यांनी दोन वर्षांपूर्वी आपला इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केला. तरीही त्यांना जॉब मिळाला नव्हता. कुटूंबियांसह, जतिन यांनासुद्धा ही गोष्ट खटकत होती.

जतिन यांनी बेटर इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, ''सुरूवातीपासूनच समाजासाठी काहीतरी करावं असं मला वाटत होतं. कॉलेजमध्ये असताना मी आणि माझे मित्र पर्यावरणासाठी काही करण्यासाठी इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टी पाहायचो. त्यासंबंधी लेख वाचायचो. त्यातून  रिड्यूज,रियूज आणि रिसायकल ही कल्पना सुचली. त्याचवेळी  मला रिसायकलिंगची संकल्पना पटली होती. पण कोणतीही गोष्ट रिसायकल करून नवीन निर्मिती करण्यासारखं माझ्याकडे काहीही नव्हते. त्यामुळे  मी रिड्यूज,रियूजवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. याच दरम्यान इंटरनेटवर इको ब्रिकबाबत वाचण्यात आलं.'' 

इको ब्रिक म्हणजे काय?

जुने प्लास्टीक, पिशव्या तसंच बाटल्या फेकून न  देता त्याची झाकणं लावून ठेवायला हवीत. या प्लास्टीकच्या कचऱ्याचा वापर  कोणत्याही वस्तूंची निर्मीती करताना विटांच्या जागी केला जाऊ शकतो. म्हणून या संकल्पनेला इको ब्रिस्क म्हणतात. कारण याद्वारे पर्यावरणाचं नुकसान होण्यापासून वाचवता येऊ शकतं. जतिन यांनी याबाबत आजूबाजूच्या लोकांना सांगून जनजागृती पसरवण्यास सुरूवात केली.  

जतिन म्हणाले की,'' ऑनलाईन वाचलं तेव्हा मला कळलं की अमेरिकेत इको ब्रिकपासून अनेक शाळा तयार करण्यात आल्या आहेत. तेव्हापासून मी प्लास्टीकच्या बाटल्या गोळा करायला सुरूवात केली. भंगारवाल्याकडूनही प्लास्टीकच्या बाटल्या  घेण्यासाठी त्यांना प्रत्येक बॉटलमागे २  रुपये दिले.  इतकंच नाही तर  शाळा, कॉलेजेसमधील शिक्षकांची चर्चा करून विद्यार्थ्यापर्यंत ही कल्पना पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. जेणेकरून पर्यावरणाबाबत जगजागृती करता येईल.''

पुढे त्यांनी सांगितले की, ''शाळेतील मुलांनी पर्यावरण जगजागृतीच्या सेमिनारला उपस्थित राहायला सुरूवात केली. मुलांनाही  या कामात खूप रस वाटू लागला. त्यांनी प्लास्टीकचा कचरा  गोळा करून शाळेत जमा केला. एका शाळेतून जवळपास ७०० एका ब्रिस्क मिळाले. कॅफे आणि हॉटेलमधून काही प्रमाणात प्लास्टीकच्या बाटल्या गोळा केल्या त्यानतंर डॉग शेल्टर तयार करायाल सुरूवात केली. या उपक्रमाला 'कबाडी' असं नाव देण्यात आलं.'' बोंबला! रस्त्यावर भीक मागत होती ही महिला, इतक्या कोटींची मालकीण असल्याचा झाला खुलासा...

सोशल मीडियाच्या माध्यमातून इको ब्रिक लोकांपर्यंत पोहोचवले. जवळपास २ वर्ष ही मोहिम  सुरू राहिली. या कालावधीत  पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी शौचालयं बांधण्याचे काम करण्याच आले. जतिन यांनी केलेलं काम  कौतुकास्पद असून आजच्या पिढीसाठी नवीन आदर्श ठरले आहे. बूटात लपवले १०० पेक्षा जास्त विषारी जिवंत कोळी; कारण वाचून तुम्हीही हादराल....

Web Title: Haryana engineer making eco bricks reusing plastic bottles to construct india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.