भन्नाट! निवडणुकीत हरल्यास २ कोटी अन् एक SUV कार; पराभूत उमेदवाराला बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 03:40 PM2022-11-19T15:40:11+5:302022-11-19T15:43:26+5:30
आपल्याकडे सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे सुरू झाले आहे. निवडणुका म्हटले की आपल्याकडे सगळ विसरुन एकमेकांविरोधातच प्रचार करत असतात.
आपल्याकडे सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे सुरू झाले आहे. निवडणुका म्हटले की आपल्याकडे सगळ विसरुन एकमेकांविरोधातच प्रचार करत असतात. मग ती निवडणुका ग्रामपंचायतीची असो की विधानसभेसाठी. सध्या आपल्याकडे एक निवडणूक चर्चेत आली आहे. या निवडणुकीत चक्क हरलेल्या उमेदवाराला बक्षीस दिले आहे.
तुम्हाला जर कोण म्हणाले की निवडणुका हरल्यानंतर तुम्हाला बक्षीस दिले जाईल.आता तुम्हाला वाटेल असं कुठे असते का, निवडणुका हरल्यानंतर कोण बक्षीस स्वरुपात पैसे देते. पण, एका ठिकाणी निवडणुका हरल्यानंतर हरलेल्या उमेदवाराला चक्क २ कोटी रुपये दिले, एवढच नाहीतर सोबत एक करकरीत एसयुव्ही कारही दिली आहे. ही घटना हरियाणामधील आहे.
बघा ही स्टंटबाजी!! पत्नी मागे बसलेली आणि गाडी चालवता चालवता हा माणूस चक्क..... व्हिडिओ व्हायरल
हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील चिडी या गावातील हे प्रकरण. या गावात पंचायत निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या सरपंच उमेदवाराचा गावकऱ्यांनी सत्कार केला. पराभूत उमेदवाराचा ग्रामस्थांनी पुष्पहार व चलनी नोटा सत्कार केला. एवढेच नाही तर पराभूत उमेदवाराला गावकऱ्यांनी २ कोटी ११ लाख रुपये रोख आणि एक चमचमीत कारही दिली. त्याचबरोबर खाप पंचायतीनेही या उमेदवाराचा सन्मान करण्याचे ठरवून त्यांना महत्त्वाचे पद देण्याची घोषणा केली.
माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या किलोई मतदारसंघातील रोहतक जिल्ह्यातील चिडी गाव हे पहिले गाव आहे. येथे धर्मपाल नावाच्या व्यक्तीने सरपंचपदासाठी निवडणूक लढवली होती. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीत नवीन दलाल यांच्याकडून ६६ मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र ग्रामस्थांनी पंचायत निवडणुकीत पराभूत होऊनही ढोल वाजवून उमेदवाराचा सत्कार केला. सर्व गावकऱ्यांनी पैसे गोळा करून त्यांना २ कोटी ११ लाख रुपये रोख आणि एक कार भेट म्हणून दिली.
गावात बंधुभाव कायम राहावा आणि उमेदवाराचे मनोधैर्य खचू नये, यासाठी हा सन्मान केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार धर्मपाल म्हणाले की, गावकऱ्यांचा हा सन्मान पाहून आपण हरलो नसून जिंकलो आहोत. विजयी उमेदवाराबाबतही आपली नाराजी नसल्याचे ते म्हणाले. गावाचा समान विकास व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. गावकऱ्यांचा हा आदर पाहून मला खूप आनंद झाला, असंही ते म्हणाले.
हरियाणात यावेळी तीन टप्प्यात पंचायत निवडणुका होत आहेत. पंचायत निवडणुका दोन टप्प्यात पार पडल्या असून तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणे बाकी आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये तर उर्वरित ४ जिल्ह्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत.