सायलेंट मॅन! ७ वर्षात ९ वेळा तुरूंगवारी, तरीही कुणालाच माहीत नाही 'तो' 'असं' का करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 05:55 PM2021-08-25T17:55:49+5:302021-08-25T18:03:27+5:30

जेव्हा त्याला पोलीस पकडतात तेव्हा याबाबत तो एक शब्दही बोलत नाही. अशात तो असं का करतो हे समजत नाही.

Has been causing traffic jams by standing in the middle of traffic for seven years | सायलेंट मॅन! ७ वर्षात ९ वेळा तुरूंगवारी, तरीही कुणालाच माहीत नाही 'तो' 'असं' का करतो?

सायलेंट मॅन! ७ वर्षात ९ वेळा तुरूंगवारी, तरीही कुणालाच माहीत नाही 'तो' 'असं' का करतो?

Next

टॅफिकच्या लांबच लांब रागांमध्ये अडकल्यावर अनेक लोकांना घाबरल्यासारखं वाटतं. तर काही लोकांचा बीपी वाढतो. खरंच रस्त्यांवर होणारं ट्रॅफिक सहनशक्तीची परीक्षा घेतं. पण जर हाच ट्रॅफिक जॅम कुणी कारण नसताना लावला तर? ब्रिटनमध्ये एक व्यक्ती गेल्या ७ वर्षापासून स्वान्जी शहरातील गाड्यांसमोर उभा राहून ट्रॅफिक जाम करतो. जेव्हा त्याला पोलीस पकडतात तेव्हा याबाबत तो एक शब्दही बोलत नाही. अशात तो असं का करतो हे समजत नाही. तो काहीच बोलत नसल्याने त्याला सायलेंट मॅन म्हटलं जातं.

५१ वर्षीय डेविड हॅम्पसन नावाची ही व्यक्ती नियमितपणे येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांसमोर येऊन उभा राहतो आणि जेव्हा त्याला पोलीस अटक करतात तेव्हा त्याबाबत एक शब्दही बोलत नाही. डेविड २०१४ पासून स्वान्जी पोलीस स्टेशन बाहेर ट्रॅफिक जाम करण्याचं काम करतो. पण का? हे कुणालाच माहीत नाही. गेल्या ७ वर्षात तो याच कारणाने ९ वेळा तुरूंगात गेला आहे.

२०१४ पासून डेविडने रस्त्याच्या मधोमध उभा राहून ट्रॅफिक जाम केलं. पण त्याला त्याच्यावर लावण्यात येणाऱ्या आरोपाची अजिबात पर्वा नाही. नेहमीप्रमाणे स्वान्जी सेंट्रल पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहून गाड्यांसमोर येऊन उभा राहतो. २०१८ मध्ये त्याला ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्यावेळीही असंच झालं होतं की, तेव्हा त्याने डिसेंबर २०२० मध्ये रस्त्यावर जाम लावला होता.

पोलीस अधिकाऱ्यांसहीत साक्षीदारांनी कोर्टात सांगितलं की, डेविड १०० टक्के बोलू शकतो. एकाने तर सांगितलं की, डेविड फारच विनम्र स्वभावाचा व्यक्ती आहे. आता एकतर डेविडचं पुढलं आयुष्य तुरूंगात  जाईल किंवा त्याला काय समस्या आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. नुकतेच कोर्टात एक व्यक्ती म्हणाले की, त्याला शिक्षेऐवजी मदतीची गरज आहे.

न्यायाधीशांनी डेविडच्या सायकियाट्रिक रिपोर्टचा ही आदेश दिला होता. पण हॅम्पसनने डॉक्टरशी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला त्याच्या मेडिकल रेकॉर्ड्स डॉक्टरकडे सोपवण्याचा आदेश दिला. जेणेकरून रहस्यावरून पडदा उठेल. त्याने पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणी उभं राहून ट्रॅफिक का अडवलं. दुसरं म्हणजे यावर तो काहीच का बोलत नाही.
 

Web Title: Has been causing traffic jams by standing in the middle of traffic for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.