बासमती पेक्षा महाग आहे 'हा' तांदूळ; किंमत 1100 रुपये किलो, फक्त 'याच' देशात केली जाते शेती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 01:55 PM2023-05-09T13:55:47+5:302023-05-09T13:56:27+5:30

सौदी अरेबियामध्ये सर्वात महाग भाताची लागवड केली जाते. श्रीमंत लोक ते मोठ्या आवडीने खातात.

hasavi rice is costlier than basmati cultivated in saudi arabia | बासमती पेक्षा महाग आहे 'हा' तांदूळ; किंमत 1100 रुपये किलो, फक्त 'याच' देशात केली जाते शेती 

बासमती पेक्षा महाग आहे 'हा' तांदूळ; किंमत 1100 रुपये किलो, फक्त 'याच' देशात केली जाते शेती 

googlenewsNext

नवी दिल्ली : पुढील महिन्यात संपूर्ण देशात मान्सून दाखल होणार आहे. यानंतर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे शेतकरी भातशेती करू लागतील. अशा प्रत्येक राज्यात शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाताची लागवड करतात. काश्मीरमधील शेतकरी बासमती भाताची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात, तर छत्तीसगडमधील शेतकरी जीराफूल भाताची शेती करतात. जीराफूल हा चव आणि सुगंधासाठी देशभर प्रसिद्ध आहे. 

दरम्यान, सौदी अरेबियामध्ये सर्वात महाग भाताची लागवड केली जाते. श्रीमंत लोक ते मोठ्या आवडीने खातात. या भाताच्या या जातीचे नाव हसावी आहे. त्याला हसावी तांदूळ असेही म्हणतात. याची सर्व देशांमध्ये लागवड होत नाही. वाळवंटातील हवामान आणि उष्ण हवामान हसावी भाताच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. जेवढी उष्णता जास्त तेवढे उत्पन्न मिळेल असे म्हणतात. 

हसावी तांदळाची लागवड फक्त सौदी अरेबियातच होण्याचे कारण आहे. हसावी भात लागवडीसाठी तापमान 48 अंश असले पाहिजे. यापेक्षा कमी तापमान असल्यास त्याचे पीक खराब होते. हसावी भात हे सौदी अरेबियातील शेख लोकांचे आवडते खाद्य आहे. सौदी अरेबियातही हसावी तांदळाची लागवड सर्वत्र होत नाही. शेतकरी विशिष्ट क्षेत्रात त्याची लागवड करतात. त्यासाठी भरपूर पाणी लागते. आठवड्यातून 5 वेळा पाणी दिले जाते.  

हसावी भाताची कापणी नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान केली जाते. हसावी तांदळाचा रंग लाल असतो. त्यामुळे त्याला लाल तांदूळ असेही म्हणतात. हा जगातील सर्वात महागडा तांदूळ आहे. सौदी अरेबियामध्ये बिर्याणी बनवण्यासाठी वापरला जातो. तांदळाची किंमत 1000 ते 1100 रुपये प्रति किलो आहे. तर, भारतातील सर्वात महाग बासमती तांदळाचा दर 150 रुपये प्रति किलो आहे.

इंडिका तांदळाचा प्रकार
हसावी तांदूळ हा इंडिका तांदळाचा प्रकार आहे. सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील प्रांत अल-अहसा ओएसिसमध्ये लोकांना हसावी तांदूळ खायला जास्त आवडतो. हसावी तांदळात बासमतीपेक्षा जास्त फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात, असे म्हणतात. यासोबतच यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही जास्त असतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे सेवन केल्याने वृद्धापकाळातही लोक ताजेतवाने दिसतात.

Web Title: hasavi rice is costlier than basmati cultivated in saudi arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.