'या' भूत बंगल्यात १० तास घालवाल तर मिळतील १४ लाख रूपये, आहे का तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:47 PM2019-10-29T12:47:09+5:302019-10-29T12:52:19+5:30

'हॉन्टेड हाऊस' बाबत तुम्ही कधीना कधी ऐकलं असेलच आणि कदाचित पाहिलंही असेल. अनेक मॉलमध्ये तुम्हाला हॉन्डेट हाऊस बघायला मिळतात.

Haunted house Mckamey manor is offering 14 lakh rupees to anyone who survive 10 hours inside their | 'या' भूत बंगल्यात १० तास घालवाल तर मिळतील १४ लाख रूपये, आहे का तयारी?

'या' भूत बंगल्यात १० तास घालवाल तर मिळतील १४ लाख रूपये, आहे का तयारी?

googlenewsNext

'हॉन्टेड हाऊस' बाबत तुम्ही कधीना कधी ऐकलं असेलच आणि कदाचित पाहिलंही असेल. अनेक मॉलमध्ये तुम्हाला हॉन्डेट हाऊस बघायला मिळतात. या घरांना असं डिझाइन केलं जातं की, आत जाऊन लोकांना भिती अनुभवता यावी. असंच एक हॉन्टेड हाऊस टेनिसीच्या समरटाऊनमध्येही आहे. या घरात न घाबरता तुम्ही १० तास राहिलात तर तुम्हाला १४ लाख रूपये बक्षिसही मिळणार आहे.

या हॉन्डेट हाऊसचं नाव आहे मेक मी मॅनर. याच्या मालकाचा दावा आहे की, न घाबरता या घरात १० तास थांबणे अशक्य आहे. पण जो कुणी १० तास न घाबरता इथे थांबेल त्याला १४ लाख रूपये बक्षिस मिळेल.

यासाठी व्यक्तीला हॉन्टेड हाऊसमध्ये जाण्याआधी ४० पानांचा एक कॉन्ट्रॅक्ट साइन करावा लागेल. घराच्या आत जाणाऱ्या व्यक्तीचं वय २१ वर्षांपेक्षा कमी असू नये. तसेच त्या व्यक्तीला त्याचं मेडिकल प्रमाणपत्रही जमा करावं लागेल.

असे सांगितले जात आहे की, हॉन्टेड हाऊसमध्ये ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक रूपाने अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. यादरम्यान व्यक्तीला रागही येऊ शकतो, पण त्यावर कंट्रोल करावं लागेल. घरात व्यक्तीला भितीदायक मेकअप केलेल्या दुसऱ्या व्यक्तींचा सामना करावा लागेल. जे अचानक एखाद्या भूतासारखे समोर येतील.

अशात हॉन्टेड हाऊसच्या आत जाणाऱ्या व्यक्तीला आधीच घरातील सगळी माहिती दिली जाणार. जेणेकरून त्याला त्याचा प्रवास सहज पूर्ण करण्यास मदत होईल. या हॉन्टेड घराच्या मालकाचं म्हणणं आहे की, आतापर्यंत एकही व्यक्ती घरात १० तास थांबू शकला नाही. कारण आता फारच भितीदायक आवाजे आणि भूतासारखे समोर येणारे कलाकार आहेत.


Web Title: Haunted house Mckamey manor is offering 14 lakh rupees to anyone who survive 10 hours inside their

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.