प्रेयसीबद्दल १४४ वाक्यं लिहिण्याची शिक्षा... चमकलात?; कारण वाचून हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:09 PM2018-08-09T17:09:57+5:302018-08-09T17:20:46+5:30
महिलांच्या छेडखानीप्रकणात अनेक कठोर शिक्षा मिळालेले तुम्ही ऐकले असेलच. पण एका कोर्टाने एका व्यक्तीला त्याच्या प्रेयसीची छेडछाड केल्याप्रकरणी अजीब शिक्षा सुनावली आहे.
हवाई : महिलांच्या छेडखानीप्रकणात अनेक कठोर शिक्षा मिळालेले तुम्ही ऐकले असेलच. पण एका कोर्टाने एका व्यक्तीला त्याच्या प्रेयसीची छेडछाड केल्याप्रकरणी अजीब शिक्षा सुनावली आहे. या कोर्टाने त्या व्यक्तीला प्रेयसीचं कौतुक करणारी १४४ वाक्य लिहिण्याची शिक्षा सुनावली आहे.
होनोलुलूमध्ये काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. येथील कोर्टाने डारेन यंग नावाच्या व्यक्तीला ही शिक्षा सुनावली. आपल्या प्रेयसीचं कौतुक करणारी १४४ वाक्ये लिहावी आणि त्यात एकाही रिपीट होऊ नये अशी अटही घातली होती. काही लोकांना ही शिक्षा गंमतीदार वाटेल. पण डारेनला ही शिक्षा दिली कारण त्याने त्याच्या प्रेयसीला काही अपशब्द वापरून त्रास दिला होता. त्याने तिला १४४ मेसेज आणि काही फोन कॉल्स केले होते.
काय आहे प्रकरण?
कॉस्मोपॉलिटिनमध्ये देण्यात आलेल्या वृत्तानुसार, ३० वर्षीय डारेन यंगला कोर्टाने आदेश दिले होते की, त्याने त्याच्या प्रेयसीसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क करु नये. मात्र डारेन कोर्टाचा हा आदेश गांभीर्याने घेतला नाही. आणि त्याने एका दिवशी तीन तासात आपल्या प्रेयसीला १४४ मेसेज पाठवले आणि फोन कॉलही केलेत.
ही आहे खरी शिक्षा
यामुळे त्याच्या प्रेयसीने कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याची तक्रार केली. डारेनने आदेशाचा भंग केल्याने नाराज न्यायाधीशांनी त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याला १५७ दिवसांची कोठडी आणि २४०० डॉलरचा दंड सुनावला. न्यायाधीश यावर थांबले नाही तर त्यांनी आदेश दिला की, डारेनने त्याच्या प्रेयसीचं कौतुक करण्यासाठी १४४ वेळा काहीतरी लिहावं आणि हे कौतुक प्रत्येकवेळी वेगळं असावं. कोर्टाचा हा अनोखा निर्णय सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.