दोन दगडांवर पाय ठेवायला गेला अन् पुरता बुडाला, प्रेयसी दोन मुलांसकट पोहचली लग्नात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 10:21 PM2021-07-13T22:21:55+5:302021-07-13T22:22:24+5:30
पठ्ठ्या दोन दगडांवर पाय द्यायला गेला आणि पुरता बुडाला. त्याचं झालं असं की लग्नात त्या वराची प्रेयसी दोन मुलांसकट पोहचली. तिने असा काही धिंगाणा घातला की त्या वरासोबत वऱ्हाडीही लग्नात अडकले. ही प्रेयसी कोणालाच मंडपाबाहेर जाऊ देईना.
शादी का लड्डू खाये वोह भी पछताये, ना खाये वोह भी पछताये, असं म्हणतात. पण एकाला हा शादीचा लड्डु चांगलाच महागात पडलाय. पठ्ठ्या दोन दगडांवर पाय द्यायला गेला आणि पुरता बुडाला. त्याचं झालं असं की लग्नात त्या वराची प्रेयसी दोन मुलांसकट पोहचली. तिने असा काही धिंगाणा घातला की त्या वरासोबत वऱ्हाडीही लग्नात अडकले. ही प्रेयसी कोणालाच मंडपाबाहेर जाऊ देईना.
सोशल मिडियावर एक जोक व्हायरल होतोय इतकीही लफडी करू नका की तुमच्या लग्नात चन्ना मेरेया गाण्यावर ग्रुप डान्स होईल. या पठ्ठ्याने नेमक हेच केलं. प्रेम केलं एकी सोबत लग्न करायला निघाला दुसरीसोबत. हे जेव्हा पहिल्या प्रेयसीला कळाले तेव्हा ती लग्नात पोहोचली आणि चांगलाच तमाशा केला. सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज ठाण्याच्या क्षेत्रातील मचहा येथील एका महिलेचे गावातीलच अरुण साह याच्यासोबत अनेक दिवसांपासून विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) होते. महिलेचं सासर राघोपूर ठाण्याच्या क्षेत्रातील हुलासमध्ये आहेत. तिला दोन मुलंही आहेत. अरूण बऱ्याचदा तिच्या घरी येत-जात असे. दोघांमधील नातेसंबंध इतके पुढे गेले की महिलेनं अरूणच्याही एका बाळाला जन्म दिला. यानंतर ती आपल्या माहेरी येऊन राहू लागली. दोघंही एकमेकांना भेटत असत.
मात्र, इतक्यात अरूणचं दुसऱ्याच मुलीसोबत लग्न ठरलं. तिला हे समजताच ती चांगलीच रागावली. आपल्या दोन पोट्ट्यांना घेऊन थेट मंडपातच पोचली. तिला आधीच सुगावा लागला की, प्रियकर अरूण याची वरात मजरूआ गावात जात आहे. ती गावकऱ्यांसोबत तिथे गेली आणि तिने प्रियकरासकट सर्व वरातींना अडवले. याचं लग्न होईल तर माझ्याशीच असा हट्ट धरत ती तिथेच ठाण मांडून बसली. दरम्यान या घटनेचा निर्णय गावच्या पंचायतीत लागणार आहे.