लग्नासाठी हेलिकॉप्टर बुकिंगची वाढली क्रेझ, जाणून घ्या किती येतो खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 11:40 AM2023-05-22T11:40:13+5:302023-05-22T12:12:34+5:30

Helicopter Booking: सध्या भारतात सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. काही दिवसांआधीच एक फोटो व्हाययरल झाला होता ज्यात नवरी-नवरदेव हेलिकॉप्टरमधून मंडपात पोहोचले.

Helicopter booking rent for wedding in India | लग्नासाठी हेलिकॉप्टर बुकिंगची वाढली क्रेझ, जाणून घ्या किती येतो खर्च!

लग्नासाठी हेलिकॉप्टर बुकिंगची वाढली क्रेझ, जाणून घ्या किती येतो खर्च!

googlenewsNext

Helicopter Booking: लग्नात सगळ्यांनाच काहीतरी वेगळं करायचं असतं. जे आयुष्यभर आठवणीत राहील. अशात अलिकडे लग्नात हेलिकॉप्टर बुकचं चलन फारच वाढलं आहे. हेलिकॉप्टरमधूनच नवरीची पाठवणी केली जाते नाही तर नवरदेवाची एन्ट्री होते. पण तुम्हाला माहीत आहे का की, भारतात लग्नात बुक केल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी किती खर्च येतो.

सध्या भारतात सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. काही दिवसांआधीच एक फोटो व्हाययरल झाला होता ज्यात नवरी-नवरदेव हेलिकॉप्टरमधून मंडपात पोहोचले. यादरम्यान सोशल मीडियावर एका यूजरने प्रश्न विचारला की, हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी किती खर्च करावा लागतो? चला जाणून घेऊ भारतात लग्नासाठी हेलिकॉप्टरची बुकिंग करण्यासाठी किती खर्च येतो.

एका मीडिया रिपोर्टनुसार, तसे तर यासाठी काही नियम बनवले आहेत. म्हणजे बुकिंग करणाऱ्या कंपन्या यांचे काही नियम असतात. जसे की, दोन तासांपेक्षा कमी बुकिंग होणार नाही आणि तसेच ते अंतरानुसार पैसे घेतील. यासोबतच हेही ठरवलं जातं की, एका निश्चित वेळेनंतर भाडं जास्त द्यावं लागेल.

बुकिंगसाठी कोणत्याही Travel Agancy च्या वेबसाइटवर जाऊ बुकिंग करता येईल. अनेक एजन्सी आहेत या याची सेवा देतात. हेलिकॉप्टरचा खर्च सीट, अंतर आणि तासांनुसार ठरतो. सध्या जे हेलिकॉप्टर चलनात आहेत ते पायलटसह तीन सीटचं असतं. एका रिपोर्टनुसार, दोन तासांचं बुकिंग करण्यासाठी दोन ते अडीच लाख रूपये खर्च येतो.

त्यानंतर दोन तासांपेक्षा जास्त वेळासाठी हेलिकॉप्टर हवं असेल तर प्रति याचं भाडं 50-60 हजार रूपयापर्यंत वाढत जाईल. काही एजन्सीचा असाही नियम आहे की, जर हेलिकॉप्टर एखाद्या दूरच्या गावात हवं असेल तर ते तिथे आणण्याचा खर्चही द्यावा लागेल. जर लग्न शहराजवळ असेल तर त्याचा खर्च कमी येईल. म्हणजे याचा काही फिक्स रेट नसतो.

Web Title: Helicopter booking rent for wedding in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.