७० हजार रूपयांना विकलं गेलं जगातलं सर्वात जास्त दुर्गंधी येणारं फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:47 PM2019-02-05T12:47:54+5:302019-02-05T12:49:25+5:30
वेगवेगळ्या फळांच्या किंमती सामान्यपणे सर्वांनाच माहीत असतात. पण कधी तुम्ही एखादं फळ ७० हजार रूपयांना विकलं गेल्याचं ऐकलंय का?
वेगवेगळ्या फळांच्या किंमती सामान्यपणे सर्वांनाच माहीत असतात. पण कधी तुम्ही एखादं फळ ७० हजार रूपयांना विकलं गेल्याचं ऐकलंय का? नक्कीच ऐकलं नसेल. पण असं एक फळ आहे जे चक्क ७० हजार रूपयांना विकलं गेलं. आश्चर्याची बाब म्हणजे हे फळ सर्वात जास्त दुर्गंधी येणार फळ मानलं जातं. इंडोनेशियाच्या वेस्ट जावामध्ये Tsikmalaya आहे. येथील एका सुपर मार्केटमध्ये जगातलं सर्वात घाणेरडी दुर्गंधी येणारं फळ ९९० डॉलरला विकलं गेलं. भारतीय करन्सीनुसार ही किंमत ७० हजार रूपये इतकी होते.
या फळाचं नाव Durian असं आहे. पहिल्या नजरेत हे फळ तुम्हाला फणसासारखं दिसेल. पण इतकी किंमत देऊन हे फळ विकत कुणी घेतलं हे अजून समजू शकलेलं नाही. या फळातून येणारी दुर्गंधी ही सडलेल्या अंड्यासारखी येते.
दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये हे डूरियन फळ आढळतं. पण थायलॅंड आणि मलेशियामध्ये या फळावर बंदी घालण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या फळाला फळांचा राजा म्हटलं जातं. याटी टेस्टही वेगळी असते. पण या फळाची दुर्गंधी डोकेदुखी वाढवणारी ठरते. या फळाचं वजन तीन किलोंपर्यंत असतं.