प्रत्येक कंपनीच्या ब्लेडच्या मधलं डिझाइन एकसारखं का असतं? इंटरेस्टींग आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 02:49 PM2021-08-12T14:49:08+5:302021-08-12T14:59:12+5:30

ब्लेडच्या मधलं डिझाइन सर्व ब्लेडमध्ये एकसारखं असतं. अखेर प्रत्येक कंपनीच्या ब्लेडचं मधलं डिझाइन एकसारखं असण्याचं कारण काय आहे? चला जाणून घेऊ कारण...

Heres why blades are designed the way they are on | प्रत्येक कंपनीच्या ब्लेडच्या मधलं डिझाइन एकसारखं का असतं? इंटरेस्टींग आहे कारण...

प्रत्येक कंपनीच्या ब्लेडच्या मधलं डिझाइन एकसारखं का असतं? इंटरेस्टींग आहे कारण...

Next

शेविंग किंवा हेअर कटींगदरम्यान तुम्ही कधी ना कधी ब्लेड पाहिलं असेलच. मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या ब्लेड तयार करतात. पण या सगळ्यात एक खास बाब आहे की, ब्लेडच्या मधलं डिझाइन सर्व ब्लेडमध्ये एकसारखं असतं. अखेर प्रत्येक कंपनीच्या ब्लेडचं मधलं डिझाइन एकसारखं असण्याचं कारण काय आहे? चला जाणून घेऊ कारण...

१९०१ सालात जिलेट कंपनीचे संस्थापक किं कॅप जिलेट यांनी त्यांचे सहकारी विलियम निकर्सनसोबत मिळून ब्लेडचं डिझाइन तयार केलं होतं. याचवर्षी त्यांनी या डिझाइनचं पेटेंट जारी केलं आणि १९०४ मध्ये ब्लेड उत्पादनही सूरू केलं.

सुरूवातीला जिलेट एकमेव अशी कंपनी होती जी ब्लेड आणि रेजरचं निर्माण करत होती. त्यावेळी बोल्डच्या माध्यमातून रेजरमद्ये ब्लेड फिट केलं जात होतं. त्यामुळे ब्लेडच्या मधोमध खासप्रकारचं डिझाइन तयार केलं गेलं. जिलेट कंपनीच्या ब्लेडचा बिझनेस वाढला तर मार्केटमध्ये दुसऱ्या कंपन्याही आल्या. पण त्यांनी जुन्या डिझाइनलाच कॉपी केलं.

त्यावेळी जिलेट ही एकमेव अशी कंपनी होती जी ब्लेडसोबत रेजरही तयार करत होती. कंपन्यांनी वेगळं डिझाइन केलं असतं तर ते रेजरमध्ये फिट बसलं नसतं किंवा नव्हतं. त्यामुळे जे डिझाइन किंग कॅपने तयार केलं तेच पुढे इतर कंपन्यांनी फॉलो केलं. आजही सर्व कंपन्यांच्या ब्लेडचं मधलं डिझाइन सारखंच आहे.

किंग कॅपला ब्लेड बनवण्याची आयडिया कुठून आली यामागेही एक इंटरेस्टींग किस्सा आहे. १८९० दरम्यान किंग कॅप झाकण बनवणाऱ्या कंपनीत काम करत होते. इथे त्यांना दिसलं की, बॉटलच्या वापरानंतर लोक झाकण फेकून देतात. पण यावरच इतकी मोठी कंपनी चालत आहे. 

त्यांच्या डोक्यात एक यूज अॅन्ड थ्रो वस्तू बनवण्याची आयडिया आली. त्या काळात वस्तरे फार खतरनाक होते आणि त्यांनी शेविंग करण्यास वेळही जास्त लागत होता. किंग कॅपने वस्तऱ्याला पर्याय शोधण्याचा विचार केला आणि १९०१ मध्ये ब्लेडचं डिझाइन तयार करून पेटेंटही करून घेतलं.
 

Web Title: Heres why blades are designed the way they are on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.