इथे तरूणींसाठी निघाली खास नोकरी, पुरूषांची इमानदारी चेक करण्यासाठी मिळतो मोठा पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 09:46 AM2022-11-05T09:46:18+5:302022-11-05T09:46:42+5:30

Job For Woman To Test Loyalty Of Men: ब्राझीलमधील एका कंपनीने एका अजब नोकरीसाठी व्हॅकन्सी काढली आहे. ही नोकरी केवळ महिलांसाठी आहे आणि यात त्यांना पगारही मोठा मिळणार आहे.

High salary job for woman to test loyalty of men by a Brazil company | इथे तरूणींसाठी निघाली खास नोकरी, पुरूषांची इमानदारी चेक करण्यासाठी मिळतो मोठा पगार

इथे तरूणींसाठी निघाली खास नोकरी, पुरूषांची इमानदारी चेक करण्यासाठी मिळतो मोठा पगार

Next

Job For Woman To Test Loyalty Of Men: जगभरातील लोक प्रोफेशनल जॉब किंवा सरकारी नोकरीत जीवतोड मेहनत करत आहेत. तर काही लोक नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशात ब्राझीलमधील एका कंपनीने एका अजब नोकरीसाठी व्हॅकन्सी काढली आहे. ही नोकरी केवळ महिलांसाठी आहे आणि यात त्यांना पगारही मोठा मिळणार आहे.

नोकरीचं नाव लॉयल्टी इन्स्पेक्टर

या नोकरीचं नाव लॉयल्टी इन्स्पेक्टर आहे. यासाठी रितसर टेस्ट आणि मुलाखत घेतली जात आहे. मजेदार बाब ही आहे की, अनेक महिलांची यासाठी नियुक्तीही झाली आहे. पण यात जे काम करायचं आहे ते फार अजब आहे. या नोकरीत जास्त टास्क दिले गेले नाहीत. फक्त एका व्यक्तीचं नाव आणि पत्ता सांगितला जातो. याच व्यक्तीची इमानदारी चेक करावी लागेल.

पुरूषांची इमानदारी चेक करणं

ज्या महिलांचं सिलेक्शन या नोकरीसाठी केलं जाणार आहे, त्यांना काही पुरूषांची लॉयल्टी टेस्ट करावी लागणार आहे. या तरूणी या कंपनीच्या माध्यमातून कुणाची गर्लफ्रेंड किंवा कुणाच्या पत्नीकडून हायर केल्या जातात. त्या आधी टार्गेट केलेल्या व्यक्तीसोबत जवळीकता वाढवतात आणि याचा पुरावा म्हणून चॅट, मेसेज किंवा फोटो त्यांना पाठवतात. 

यानंतर पुरूषांचं व्यवहार कसा राहतो याची माहिती तरूणी आपल्या क्लाएंटला देतात. या नोकरी तरूणींच्या क्लाएंट महिला किंवा तरूणीच असतात. मीडिया रिपोर्ट्समध्ये एका केस स्टडीच्या हवाल्याने सांगण्यात आलं आहे की, 22 वर्षीय एका महिलेने सांगितलं की, तिच्याकडे या नोकरीची ऑफर आली. तिने पहिल्यांदा काम केलं. सध्या या नोकरीवरून लोक चांगलीच चर्चा करत आहेत.

Web Title: High salary job for woman to test loyalty of men by a Brazil company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.