बाबो! रस्त्यावर मलबा...बाजूला खोल दरी...खांद्यावर बाइक घेऊन 'बाहुबली'ने रस्ता केला पार...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 12:07 PM2021-07-21T12:07:07+5:302021-07-21T12:07:46+5:30
एका 'बाहुबली'चा व्हिडीओ व्हायरल झालाय. चंबाच्या तिस्सामध्ये रस्त्यावर मलबा आल्याने एक व्यक्ती चक्क खांद्यावर बाइक उचलून नेताना दिसत आहे.
हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठिकठिकाणी पाणी भरल्याने रस्ते बंद पडले. पावसामुळे मलबा लोकांच्या घरात आणि रस्त्यावर आळा. ज्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
अशात एका 'बाहुबली'चा व्हिडीओ व्हायरल झालाय. चंबाच्या तिस्सामध्ये रस्त्यावर मलबा आल्याने एक व्यक्ती चक्क खांद्यावर बाइक उचलून नेताना दिसत आहे. मलब्यामुळे तो बाइकने रस्ता पार करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने बाइक थेट खांद्यावर घेत रस्ता पार केला. (हे पण वाचा : OMG! काही न खाता-पिता १० दिवस झाडावर राहिलं कपल, खतरनाक अस्वलाने तरी सोडला नाही पिच्छा)
जर या व्यक्तीचा पाय जराही घसरला असता तर तो थेट दरीत कोसळला असता. पण 'बाहुबली'ने खांद्यावर सहजपणे बाइक घेतली आणि काही मिनिटात मलबा पार करून दुसऱ्या बाजूला गेला. मुसळधार पावसामुळे जागोजागी भूस्खलन झालं आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद आहेत. पण लोक जीव मुठीत घेऊन रस्ते पार करत आहेत.
पावसामुळे चंबाच्या भरमौर मार्गही बंद होता. तेच चंबा भरमौर मार्गावर भूस्खलनामुळे एक कार रावी नदीत वाहून गेली. ज्यात तीन लोक रावी नदीत बुडाले. यात एका महिलेचा मृतदेह काढण्यात आला. इतर दोन मृतदेहांचा शोध सुरू आहे. अशात बाइक खांद्यावरून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.