40 वयात बदलला त्याचा असा विचार, लाखोंची नोकरी अन् आलिशान घर सोडून जंगलात राहतो; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:07 PM2024-03-06T15:07:26+5:302024-03-06T15:09:45+5:30
काही कपडे घेऊन तो निघाला आणि जंगलात राहू लागला. त्याने असं का केलं यामागचं कारण वाचाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.
चांगली नोकरी, चांगलं घर आणि खूपसारे पैसे सगळ्यांनाच हवे असतात. पण एका व्यक्तीने केवळ 40 वयात चांगली नोकरी सोडली. लाखो रूपये पगार असूनही त्याला 9 ते 5 या वेळेतली नोकरी आवडली नाही. तो इतका वैतागला होता की, त्याने त्याचं आलिशान घरही विकलं आणि बेघर झाला. काही कपडे घेऊन तो निघाला आणि जंगलात राहू लागला. त्याने असं का केलं यामागचं कारण वाचाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारा एरोन फ्लेचर एक कॉर्पोरेट नोकरी करत होता. आजच्या तरूणांसारखी त्याचीही लाइफस्टाईल होती. महागडे कपडे घालणं, चांगली गाडी अशीही त्याची लाइफ होती. पण एक दिवस त्याला वाटलं की, ज्याप्रकारे त्याचं जीवन पुढे जात आहे ते एकना एक दिवस संपणार संपेल. इतकी धावफळ कशासाठी करायची? इथेच त्याचं मन बदललं.
फ्लेचरने पारंपारिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि घरातून बाहेर पडला. काही कपडे आणि थोड्या वस्तू घेऊन लाकडाच्या गाडीत तो बाहेर पडला. आता तो शेळ्यांसोबत एका शहरातून दुसऱ्या शहरात जात आहे. लोकांना भेटतो. खाण्यासाठी धान्यही स्वत: शेतात उगवतो. फ्लेचर आता एक चांगलं जीवन जगत आहे.
फ्लेचर सांगतो की, माझं जीवन जगण्यासाठी मला जास्त पैशांची गरज नाही. काहीच खर्च करावा लागत नाही. आपल्या छोट्याशा लाकडी गाडीत फिरतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो. तो म्हणाला की, जेवढा जास्त पैसा तुमच्याकडे असेल तेवढ्या तुमच्या अपेक्षा वाढतात. तुम्ही असमाधानी रहाल. जर सगळ्यांचं जेवण शेतातून येणार असेल तर सगळ्यांनी त्यावर अवलंबून का राहू नये? फ्लेचर रोज त्याच्या प्रवासाचे व्हिडीओ यू्ट्यूबवर शेअर करतो. लोकांना सांगतो की, कसं ग्रिड फ्री राहता येतं.