६०० वर्ष जुनी मशीद जशीच्या तशी दुसऱ्या जागी केली शिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 10:44 AM2018-12-27T10:44:35+5:302018-12-27T10:49:15+5:30

तुर्कीमध्ये करण्यात आलेलं एक अनोखं काम सध्या चांगलंच चर्चेत आहे. इथे एक ६०० वर्ष जुनी मशीद तंत्रज्ञानाच्या आधारे एका जागेवरुन हलवून २ किमी अंतरावरील दुसऱ्या जागेवर शिफ्ट करण्यात आली.

Historical mosque shifted to a new site in Turkey | ६०० वर्ष जुनी मशीद जशीच्या तशी दुसऱ्या जागी केली शिफ्ट!

६०० वर्ष जुनी मशीद जशीच्या तशी दुसऱ्या जागी केली शिफ्ट!

googlenewsNext

तुर्कीमध्ये करण्यात आलेलं एक अनोखं काम सध्या चांगलंच चर्चेत आहे. इथे एक ६०० वर्ष जुनी मशीद तंत्रज्ञानाच्या आधारे एका जागेवरुन हलवून २ किमी अंतरावरील दुसऱ्या जागेवर शिफ्ट करण्यात आली. ही मशीद १५व्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे. तुर्कीमध्ये चौथा सर्वात मोठं धरण बांधण्यासाठी ही मशीद मूळ जागेवरुन हलवण्यात आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करत असताना मशीदच्या इमारतीचं काहीच नुकसान झालं नाही. 

६०० वर्ष जुनी मशीद

तुर्कीमध्ये देशातील चौथं सर्वात मोठं धरण 'इलिसु' बांधलं जात आहे. हे धरण बांधून झाल्यावर तुर्कीतील ऐतिहासिक शहर हसनकेफ धरणातील पाण्यात बुडणार आहे. त्यामुळे ६० वर्ष जुनी मशीद बुडण्यापासून वाचवण्यासाठी ती दुसऱ्या जागी हलवण्यात आली. 

३०० चाकांच्या आधारे मशीद हलवली

रिपोर्टनुसार, मशीद दुसऱ्या जागेवर हलवण्याचं काम गेल्यावर्षी सुरु झालं होतं. या मशीदचं वजन ४, ६०० टन इतकं आहे. ही हलवण्यासाठी तीन भागात विभागण्यात आली. नंतर रस्त्याने दुसऱ्या जागेवर नेण्यात आलं. या कामासाठी खास मशिनांची आणि रोबोटची मदत घेण्यात आली. मशीद दुसऱ्या जागी हलवण्यासाठी ३०० चाकांचं एक विशाल प्लॅटफॉर्मची मदत घेण्यात आली. आता मशीदला जोडण्याचं काम सुरु झालं आहे.  

'इलिसु' धरण बांधून तयार झाल्यावर प्राचीन शहर हसनेफ पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे २०१७ मध्ये या ऐतिहासिक शहरातील जास्तीत जास्त वस्तू हसनकेफ कल्चरल पार्कमध्ये शिफ्ट करण्यात आल्या. 
 

Web Title: Historical mosque shifted to a new site in Turkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.