एका छोट्या घटनेतून सूचली होती Cotton Swab बननण्याची कल्पना, जाणून घ्या इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 02:48 PM2022-01-22T14:48:28+5:302022-01-22T14:51:45+5:30

History of Cotton Swab : Cotton Swab आज अनेकांच्या जीवनातील महत्वाचा भाग झाला आहे. पण अनेकांना याची निर्मिती कशी? कधी? झाली होती याची कल्पना नाही. आज आम्ही तेच सांगणार आहोत.

History of cotton swab, Know the interesting facts | एका छोट्या घटनेतून सूचली होती Cotton Swab बननण्याची कल्पना, जाणून घ्या इतिहास

एका छोट्या घटनेतून सूचली होती Cotton Swab बननण्याची कल्पना, जाणून घ्या इतिहास

googlenewsNext

History of Cotton Swab : बऱ्याच वस्तूंचा आविष्कार करताना याचा विचार  केला गेला नव्हता की, पुढे जाऊन मोठमोठ्या कामांमध्ये याचा फायदा होईल. Cotton Swab चं सुद्धा तसंच आहे. जो आज कोविड संक्रमणाच्या टेस्टींगमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. Cotton Swab आज अनेकांच्या जीवनातील महत्वाचा भाग झाला आहे. पण अनेकांना याची निर्मिती कशी? कधी? झाली होती याची कल्पना नाही. आज आम्ही तेच सांगणार आहोत.

Cotton Swab काही नवीन वस्तू नाही. आज ती आधुनिक जीवनाचा भाग झाली आहे. घरापासून ते हॉस्पिटल लॅब आणि मेडिकल लॅबमध्ये याचा वापर केला जातो. घरात सामान्यपणे याचा वापर कान साफ करण्यासाठी आणि महिला मेकअपसाठी करतात. तसे तज्ज्ञ सांगतात की, कॉटन स्वाबने कान अजिबात साफ करू नये.

हत्या चौकशीतही महत्वाची भूमिका

सामान्य दिसणारा हा कॉटन स्वॅब गुन्हेगाराला पकडण्यासाठीही फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत करतो. याच्या माध्यमातून संशयीत व्यक्तीचा DNA सॅम्पल घेतला जातो. जेणेकरून क्राइम सीनवर सापडलेल्या सॅम्पलसोबत मॅच करता यावा. 

लाकडी ते प्लास्टिकपर्यंतचा प्रवास

आधी जे कॉटन स्वॅब वापरले जात होते ते लाकडी असायचे म्हणजे बारीक काडीच्या वर रूई लावला जात होता. पण आजकाल प्लास्टिकचा वापर होतो. यासाठी चांगल्या गुणवत्तेचा प्लास्टिक वापरला जातो. 

कॉटन स्वॅबचा इतिहास

कॉटन स्वॅबचा आविष्कार  करणाऱ्या व्यक्तीचं नाव Leo Gerstenzang सांगितलं जातं. १९२० च्या दशकात पहिला कॉटन स्वॅब तयार करण्यात आला होता. याच्या आविष्काराला एक छोटीशी घटना कारण आहे. असं मानलं जातं की, एकदा लियो त्याच्या पत्नीला माचीसच्या काडीवर रूई लावताना मुलांचा कान साफ करताना पाहिलं होतं. हे पाहूनच त्याला कॉटन

स्वॅब तयार करण्याची कल्पना सुचली

यानंतर त्याने "Baby Gays" नावाने एक कॉटन स्वॅबचं उत्पादन तयार केलं. त्यांनी या कंपनीला Leo Gerstenzang Infant Novelty Company असं नावंही दिलं होतं. १९२६ पर्यंत याला "Baby Gays" म्हटलं गेलं आणि नंतर याचं नाव Q-Tips करण्यात आलं. तेव्हापासूनच याची मागणी वाढली.

गरजेनुसार वेगवेगळ्या कामांमध्ये कॉटन स्वॅबचा वापर केला जातो. तेच कोविडच्या टेस्टसाठी वापरला जाणारा आणि कान साफ करण्यासाठी वापरला जाणारा स्वॅब वेगळा असतो. कोविड टेस्टिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वॅबला Nasopharyngeal Swab म्हटलं जातं. 

हे पण वाचा :

ख्रिश्चन इस्लाम आणि ज्यू धर्मीय जेरूसलेमसाठी आजही का भांडतात?
 

Web Title: History of cotton swab, Know the interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.