हिट अँड रन’- गाजलेल्या घटना

By Admin | Published: December 11, 2015 02:18 AM2015-12-11T02:18:24+5:302015-12-11T02:18:24+5:30

मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने बीएमडब्ल्यू मोटार चालविल्याने दिल्लीत लोधी रोडच्या चौकात तीन पोलिसांसह एकूण सहा जणांचा चिरडून मृत्यू

Hit and Run '- Occurring Events | हिट अँड रन’- गाजलेल्या घटना

हिट अँड रन’- गाजलेल्या घटना

googlenewsNext

संजीव नंदा (नवी दिल्ली)
२ वर्षे कैद व समाजसेवा
 आरोपी- संजीव नंदा, निवृत्त नौदलप्रमुख एस. एम. नंदा यांचा नातू
> घटनेचा दिनांक- १० जानेवारी १९९९
> मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने बीएमडब्ल्यू मोटार चालविल्याने दिल्लीत लोधी रोडच्या चौकात तीन पोलिसांसह एकूण सहा जणांचा चिरडून मृत्यू.
> घटनेनंतर १० वर्षांनी सुरुवातीस निर्दोष मुक्तता.
>जनक्षोभानंतर खटल्याची फेरसुनावणी. त्यात तीन वर्षांचा कारावास.
>२०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कमी करून दोन वर्षे केली. त्याशिवाय मोठा दंड आणि दोन वर्षे समाजसेवा करण्याचा आदेश
>>> अ‍ॅलिस्टर परेरा (मुंबई)
>आरोपी- अ‍ॅलिस्टर अ‍ॅन्थनी परेरा. उद्योगपतीचा मुलगा.
> घटनेचा दिनांक-१२ नोव्हेंबर, २००६
> मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने टोयोटा कोरोला मोटार चालविल्याने मुंबईत वांद्रे येथील कार्टर रोडच्या पदपथावर झोपलेले सात बांधकाम मजूर चिरडून ठार, आठ जखमी.
> दंडाधिकारी न्यायालयात सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा.
> सर्वदूर टीका झाल्यानंतर शिक्षा वाढविण्यासाठी उच्च न्यायालयाचा स्वत:हून हस्तक्षेप.
>वर्ष २००७- निष्काळजीपणाने मोटार चालविल्याबद्दल उच्च न्यायालयाकडून तीन वर्षांच्या कारावासाची व जबर भरपाईची शिक्षा.
> सर्वोच्च न्यायालयातही ही शिक्षा कायम. राज्य सरकारने मागणी न केल्याने शिक्षा याहून वाढविण्यास नकार.

Web Title: Hit and Run '- Occurring Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.