भारतातील एक असं गाव जिथे गुलाल, रंगासोबत नाही तर विंचवांसोबत खेळली जाते होळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 12:24 PM2021-03-27T12:24:55+5:302021-03-27T12:25:29+5:30
होळीला भारतातील वेगवेगळ्या भागात अनेक रितीरिवाज पाळले जातात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे रंगपंचमी साजरी केली जाते.
भारतातील सर्वात महत्वाच्या उत्सवांपैकी एक म्हणजे होळी आणि रंगपंचमी. यावेळी लोक एकमेकांना रंग लावतात आणि आनंद घेतता. सोबतच वेगवेगळे गोड पदार्थही खातात. हा उत्सव फार जल्लोषात साजरा केला जातो. रंगाने माखलेले इतर लोक पाहून कुणाचंही त्यांच्यासारखं रंग खेळण्याचं मन होईल.
होळीला भारतातील वेगवेगळ्या भागात अनेक रितीरिवाज पाळले जातात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे रंगपंचमी साजरी केली जाते. असाच एक वेगळा प्रकार उत्तर प्रदेशच्या बरसानामध्ये बघायला मिळतो. नंदगाव आणि वृंदावनमधील होळी तर जगभरात प्रसिद्ध आहे
होळीचा एक सर्वात घातक प्रकार आहे. The Times of India च्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे होळीला विंचवांची पूजा केली जाते. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत होळी खेळली जाते. सॅंथना गावातील लोकांना विश्वास आहे की, या दिवशी विंचू दंश मारत नाही. ते विंचवांसोबत अनोख्या पद्धतीने होळी साजरी करतात.
दैनिक जागरणच्या एका लेखानुसार, होळीदरम्यान सर्वच दिवशी या गावतील लोकांना विंचवाचं विष चढतं. सॅंथना गावातील लोक होळीच्या दिवशी भैसान देवीच्या गढावर चढतात आणि तेव्हा तिथे शेकडो विंचू निघतात. हे विंचू लोक आपल्या अंगा-खांद्यावर घेऊन फिरतात. विंचू आरामात लोकांच्या अंगावर राहतात आणि बेफिकिर राहतात. पण अशाप्रकारची होळी खेळण्यामागचं कारण काय हे कुणालाही माहीत नाही.
होळीचं दहन केल्यावर येथील लोक देवीच्या गढावर जातात. देवीची पूजा करतात. त्यानंतर तेथील दगड बाजूला करतात. ज्यातून शेकडो विंचू बाहेर निघतात. काही लोकांचं मत आहे की, हे लोक गात असलेली गाणी ऐकून विंचू बाहेर येतात. नंतर गाणी गाउन विंचवांना पुन्हा तिथेच सोडलं जातं आणि गावातील लोक घरी परततात.