या व्हिस्कीच्या बॉटलने केला वर्ल्ड रेकॉर्ड, लिलावात मिळालेली रक्कम वाचून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 03:45 PM2018-10-04T15:45:01+5:302018-10-04T15:45:35+5:30
व्हिस्कीची एक दुर्मिळ बॉटलने वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे. हा रेकॉर्ड जगातली सर्वात महाग व्हिस्कीची बॉटल असण्याचा आहे.
व्हिस्कीची एक दुर्मिळ बॉटलने वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे. हा रेकॉर्ड जगातली सर्वात महाग व्हिस्कीची बॉटल असण्याचा आहे. स्कॉटलॅंडची राजधानी एडिनबर्गमध्ये बुधवारी आयोजित एका लिलावात व्हिस्कीची ही बॉटल ८.०९ कोटी रुपयांना विकली गेली. इतकी किंमत मिळाली असे या बॉटलमध्ये काय आहे? याची लोकांमध्ये उत्सुकता लागली आहे.
तज्ज्ञांच्या मते ही बॉटल फारच खास आहे. कारण ही बॉटल १९२६ च्या मॅकलन वॅलेरियो अदामीची व्हिस्की आहे. कलेक्टर्स या खास बॉटलबाबत फार उत्सुक होते. कारण ही फार दुर्मिळ बॉटल आहे. तसेच यावर करण्यात आलेलं आर्ट वर्कही फार उत्तम आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, व्हिस्कीची ही बॉटल ६० वर्ष जुनी आहे. व्हिस्कीच्या या बॉटल १९२६ ते १९८६ दरम्यान बनवण्यात आल्या होत्या. एडिनबर्गचे व्हिस्की एक्सपर्ट मार्टिन ग्रीन सांगतात की, 'मी या रिझल्टने फार खूश आहे. ही फार गर्वाची बाब आहे की, व्हिस्कीच्या दुनियेत स्कॉटलॅडने एक नवीन रेकॉर्ड कायम केलाय'.
वालरियो अदामी आणि पीटर ब्लेक नावाच्या दोन पॉप आर्टिस्टने या व्हिस्कीच्या फार लहान एडिशनचं लेबल डिझाइन केलं होतं. ज्यात २४ बॉटल्स होत्या. यातील १२ बॉटल्स ब्लेकने डिझाइन केल्या होत्या. तर १२ अदामीने डिझाइन केल्या होत्या.