केवळ 10 रूपये खर्चून कूलरमधून काढली AC सारखी हवा, देशी जुगाड पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 02:28 PM2023-05-26T14:28:51+5:302023-05-26T14:33:11+5:30

Viral Video : भारतात तर जुगाड करणारे खूप लोक आहेत. त्यांचे जुगाड पाहून लोक हैराण होतात. व्हिडिओत एका व्यक्तीने 10 रूपयात जो कारनामा केला तो खरंच कौतुकास्पद आहे.

Home made ac in just Rs 10 : Jugadu man used mataka to make cooler air like AC | केवळ 10 रूपये खर्चून कूलरमधून काढली AC सारखी हवा, देशी जुगाड पाहून व्हाल हैराण

केवळ 10 रूपये खर्चून कूलरमधून काढली AC सारखी हवा, देशी जुगाड पाहून व्हाल हैराण

googlenewsNext

Viral Video : असं म्हणतात की, गरज ही अविष्काराची जननी आहे. गरज व्यक्तीला कधी काय करायला भाग पाडेल सांगता येत नाही. सध्या उकाडा इतका वाढला आहे की, लोक गरमीने हैराण आहेत. अशात हा उकाडा कमी करण्यासाठी एका व्यक्तीने भारी जुगाड केला आहे. त्याने केलेला जुगाड बघून लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एका व्यक्तीने केवळ 10 रूपयात जुन्या कूलरमधून एसीसारखी थंड हवा काढली. लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. 

जगभरात जुगाड करणाऱ्या लोकांची काही कमतरता नाही. भारतात तर जुगाड करणारे खूप लोक आहेत. त्यांचे जुगाड पाहून लोक हैराण होतात. व्हिडिओत एका व्यक्तीने 10 रूपयात जो कारनामा केला तो खरंच कौतुकास्पद आहे. तेच काही यूजर्सना हा देशी जुगाड ट्राय करायचा आहे. 

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे व्यक्ती काही मडक्यांना तोडून ते कूलरमध्ये टाकतो. त्यानंतर एका मडक्यात पाइप फिट करून कूलरमध्ये पाणी भरतो. पुढे जे होतं ते तुम्ही बघू शकता.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर करण्यात आला आहे. 20 मे रोजी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, 'घरी तयार करण्यात आलेला एसी केवळ 10 रूपयात'. 

5 दिवसांआधी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 8 लाख 54 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहणारे लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या व्यक्तीचं भरभरून कौतुक केलं आहे.

Web Title: Home made ac in just Rs 10 : Jugadu man used mataka to make cooler air like AC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.