घरातील मुंग्यामुळे झाले आहात हैराण? लगेच करा हे घरगुती उपाय, मुंग्या होतील गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 01:08 PM2023-06-02T13:08:37+5:302023-06-02T13:09:24+5:30
Get rid of red ants: या मुंग्यांपासून सुटका मिळवणं फार गरजेचं असतं. या मुंग्या पळवण्यासाठी काही घरगुती उपाय करतात येतात. चला जाणून हे उपाय...
Get rid of red ants: उन्हाळ्यात वेगवेगळ्या कारणांनी घरात मुंग्या येतात. या मुंग्यांमुळे लोक हैराण होतात. घरात सगळीकडे मुंग्या असल्याने घरात राहणंही अवघड होतं. गोड पदार्थांवर य मुंग्या लागलेल्या असतात. या मुंग्यांपासून सुटका मिळवणं फार गरजेचं असतं. या मुंग्या पळवण्यासाठी काही घरगुती उपाय करतात येतात. चला जाणून हे उपाय...
दालचीनी - मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी दालचीनीही फायदेशीर ठरते. यासाठी दालचीनी आणि लवंग एकत्र मुंग्या लागतात तिथे ठेवा. घरात जिथे जिथे मुंग्यांची घरं आहेत तिथे दालचीनी पावडर आणि लवंग ठेवा. तुम्ही दालचीनी आणि लवंगच्या एसेंशिअल ऑइलचाही वापर करू शकता.
मीठ - घरातील कोपऱ्यांमध्ये मीठ टाकणं फायदेशीर ठरू शकतं. जिथे जिथे मुंग्या येतात तिथे तुम्ही थोडं मीठ टाका. तसेच मिठाचं पाणी तयार करून ते स्प्रे सारखंही वापरू शकता. हा उपाय केला तर मुंग्या घरातून लगेच पळून जातील.
लिंबू - ज्या ठिकाणी मुंग्या दिसतात तिथे लिंबू पिळा किंवा लिंबाची साल तिथे ठेवा. तसेच लादी पुसताना त्या पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. फरशीवर लिंबाचा सुगंध आला तर मुंग्या घाबरून पळून जातात. कडू आणि आंबट गोष्टींपासून मुंग्या दूर राहतात.
चॉक - लाल मुंग्या पळवण्यासाठी चॉक फार महत्वाचा ठरतो. चॉकमध्ये कॅल्शिअम कार्बोनेट असतं. जे मुंग्यांना पळवण्यासाठी फायदेशीर असतं. तुम्ही चॉक म्हणजेच खडूची पावडर करून मुंग्या ज्या ठिकाणी आहे तिथे टाका किंवा चॉक तिथे ठेवा. चॉकने रेषा आखली तर मुंग्यांसोबतच माकोडे, कीडेही दूर पळतात. याची काळजी घ्या की, लहान मुलांना चॉकपासून ठेवा.
काळे मिरे - जेवढं प्रेम मुंग्यांचं साखरेवर असतं तेवढाच राग मुंग्या काळ्या मिऱ्यांचा करतात. काळ्या मिऱ्याचं पावडर किंवा काळ्या मिऱ्यांचं पाणी मुंग्यांवर शिंपडलं तर मुंग्या घरातून गायब होतील.