घराचं वॉटरप्रूफिंग
By Admin | Published: July 10, 2015 09:46 PM2015-07-10T21:46:23+5:302015-07-10T21:46:23+5:30
उन्हाच्या चिकचिकाटातून सोडवणारा पावसाळा हा तसा अनेकांचा आवडता ऋतू. अनेकांना पावसात मनसोक्त भिजायला आवडते. तर काहींना घरातच बसून पावसाचा आनंद लुटायचा असतो.
उन्हाच्या चिकचिकाटातून सोडवणारा पावसाळा हा तसा अनेकांचा आवडता ऋतू. अनेकांना पावसात मनसोक्त भिजायला आवडते. तर काहींना घरातच बसून पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण, याच पावसाळ्यात घराची नीट काळजी घेतली नाही तर हा पाऊस घरासाठी धोकादायक ठरू शकतो. आणि घरात बसून मनसोक्त पाऊस अनुभवण्याच्या आनंदावरच विरजण पडू शकते त्यामुळे पावसापासून घराची काळजी घेणे खूप आवश्यक ठरते. यासाठी काही गोष्टींची खातरमजा करणेही महत्वाचे ठरते.
भिंती आणि छप्पर गळके नाही ना, याची खात्री करून घ्या. छप्पराला गळती किंवा भिंतीत ओलावा आला असेल तर त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. गच्चीतील भेगा भरून मग वॉटरप्रुफिंग करायला हवे. छतावर पडणारे पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी जर पाईप असेल तर तो सातत्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यामुळे गच्चीवरच पाणी साठून राहणार नाही.
घरातील सर्वाधिक ओलावा येणाऱ्या ठिकाणी व्हेंटिलेटर्सची सोय करायला हवी. पाऊस सातत्याने कोसळत राहिला तर अशा सततच्या ओलाव्याने घरातील लोकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे घरात ताजी हवा येणे हे देखील गरजेचे आहे.
घरातील विद्युत उपकरणांची जोडणी व्यवस्थित आहे ना, याची पाहणी पावसाच्याआधीच करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात हमखास भेडसावणारी समस्या म्हणजे वाळवी. जेथे ओलावा येतो किंवा भरपूर आर्द्रता असते, अशा ठिकाणी वाळवीचा धोका असतो. यासाठी पेस्ट कंट्रोल करणे हा उत्तम उपाय ठरू शकतो.