याला म्हणतात नशीब! राहायला घर नव्हतं, डोळे बंद केले अन्...; आता झाली 40 कोटींची मालकीण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 09:38 AM2023-05-21T09:38:17+5:302023-05-21T09:39:11+5:30
ज्या महिलेकडे राहण्यासाठी घरही नव्हते, ती क्षणार्धात करोडपती झाली. एका रात्रीत तिचं आयुष्य बदललं.
कोणाचं नशीब कधी, कुठे, कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. ज्या महिलेकडे राहण्यासाठी घरही नव्हते, ती क्षणार्धात करोडपती झाली. एका रात्रीत तिचं आयुष्य बदललं. तिला प्रचंड आनंद झाली. माझा विश्वास बसत नाही की मी 40 कोटींहून अधिकची मालक बनले आहे असं महिलेने म्हटलं आहे. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियामध्ये ही घटना घडली.
रिपोर्टनुसार, कॅलिफोर्निया राज्य लॉटरीने बुधवारी विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये पिट्सबर्ग येथील रहिवासी असलेल्या लूसिया फोर्सेथची लॉटरी लागली. तेही एक-दोन कोटींचे नव्हे, तर एकूण 40 कोटी 85 लाखांचr. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर लtसियाचा विश्वास बसत नव्हता. लॉटरी कार्यालयाशी संपर्क साधून तिने याची पुष्टी केली.
लूसिया म्हणाली, "सहा वर्षांपूर्वी मी बेघर होते. या वर्षी माझं लग्न होणार आहे. ग्रॅज्युएशनचा अभ्यासही पूर्ण होत आहे आणि मी 5 मिलियन डॉलर्सही जिंकत आहे. आश्चर्यकारक योगायोग. मी खूप आनंदी आहे."
'एवढी मोठी रक्कम जिंकण्याची अपेक्षा नव्हती'
ती पुढे म्हणाली की, मी एवढी मोठी रक्कम जिंकेन असं कधीच वाटलं नव्हतं. डोळे बंद केले आणि लॉटरीचं तिकीट घेतलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बक्षीस जिंकलं. लूसियाने पिट्सबर्गमधील वॉलमार्ट सुपरसेंटरमधून लकी लॉटरीचे तिकीट खरेदी केले. लॉटरी लागल्याचे समजताच ती गाडीत पेट्रोल भरत होती.
कॅलिफोर्निया लॉटरीने जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटलं आहे की, लूसिया फोर्सिथ भाग्यवान विजेत्यांपैकी एक आहे. ती आता करोडपती झाली आहे. त्याच वेळी, कॅलिफोर्निया लॉटरीच्या प्रवक्त्या कॅरोलिन बेकर म्हणाल्या - सार्वजनिक शिक्षणासाठी अतिरिक्त निधी उभारणे हे आमचे ध्येय आहे आणि हे आमच्या खेळाडूंच्या पाठिंब्यानेच शक्य आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.