मुलींचा सन्मान ! सूरतमधील व्यावसायिकाने वाटले 200 कोटी

By admin | Published: May 3, 2017 03:29 PM2017-05-03T15:29:18+5:302017-05-03T16:03:47+5:30

गुजरातमधील एका व्यावसायिकाने पाटीदार समाजाच्या 10 हजार मुलींसाठी 200 कोटींचा बॉण्ड दिला आहे

Honor daughters! The prospect of the Sutra thought 200 million | मुलींचा सन्मान ! सूरतमधील व्यावसायिकाने वाटले 200 कोटी

मुलींचा सन्मान ! सूरतमधील व्यावसायिकाने वाटले 200 कोटी

Next
ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. 3 - गुजरातमधील एका व्यावसायिकाने पाटीदार समाजाच्या 10 हजार मुलींसाठी 200 कोटींचा बॉण्ड दिला आहे. मंगळवारी सूरतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात लवजी डी. दैल्या उर्फ बादशाह यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "बेटी बचाओ बेटी पढ़ाओ" अभियानातून प्रेरणा मिळाल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
200 कोटींचा बॉण्ड देणा-या बिल्डर आणि व्यावसायिक लवजी यांना सांगितलं की, "आमच्या समाजात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे. डॉक्टरांशी बोललो असता लक्षात आलं की, लोकांमध्ये बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याची इच्छा आहे. यासाठी माझ्या कुटुंबाने दुस-या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी हा बॉण्ड देण्याचा निर्णय घेतला". या बॉण्डनुसार मुलीला तिच्या 20व्या जन्मदिवशी दोन लाख रुपये मिळतील. 
 
2015-16 या वर्षात जन्मलेल्या आणि कुटुंबातील दुसऱ्या मुलींनाही ‘बादशाह सुकन्या बॉण्ड’ योजनेअंतर्गत ही रक्कम देण्यात येणार आहे.
 
10 हजार मुलींना 200 कोटींच्या हिशेबाने प्रत्येकी दोन लाख रुपये मिळाले आहेत. यावेळी पाटीदार समाजातील पदाधिका-यांच्या हस्ते बॉण्डचं वाटप करण्यात आलं. 
 
अशाप्रकारे बॉण्ड वितरण होण्याची हा काही पहिलीच वेळ नसून याआधीही असा कार्यक्रम झाला आहे. गतवर्षी सूरत, अहमदाबाद, आणि सूरतमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात 10 हजार मुलींना अशाप्रकारचा बॉण्ड दिला गेला होता. यावर्षीदेखील राजकोट आणि यावर्षीही अहमदाबादमध्ये 8 मे आणि राजकोटमध्ये 15 मे रोजी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल.
 

Web Title: Honor daughters! The prospect of the Sutra thought 200 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.