समुद्र किनाऱ्यावर आढळला दुर्मिळ जीव, पहिल्यांदा २०१४ मध्ये दिसला होता!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 03:34 PM2019-03-04T15:34:54+5:302019-03-04T15:35:31+5:30
समुद्रात असे अनेक विशाल जीव राहतात जे अजूनही जगासमोर आले नाहीत. तर काही असे जीव आहेत जे क्वचितच निदर्शनास पडतात.
समुद्रात असे अनेक विशाल जीव राहतात जे अजूनही जगासमोर आले नाहीत. तर काही असे जीव आहेत जे क्वचितच निदर्शनास पडतात. हा समुद्र विशाल मनुष्यांसोबतच वेगवेगळ्या जीवांचंही पोट भरतो. समुद्रातील कितीतरी जीव आजही संशोधकांना मिळालेले नाहीत. पण जेव्हाही असे दुर्मिळ जीव समोर येतात तेव्हा समुद्राच्या खोलीची जाणीव होते. नुकताच कॅलिफोर्नियातील यूसी सांता बारबराच्या अमेरिकन रिव्हिएराच्या किनाऱ्यावर एक दुर्मिळ जीव आढळला. ज्याला बघून लोक हैराण झाले.
७ फूट लांब हा जीव एक मासा आहे. परीक्षणानंतर अभ्यासकांना आढळलं की, हा मासा 'हुडविंकर सनफिश' आहे. हा फार दुर्मिळ समुद्री जीव आहे. हा जीव याआधी २०१४ मध्ये आढळला होता. त्यानंतर दोन वर्षांआधी ही जीव न्यूझीलॅंडमध्येही आढळला होता.
Scientists baffled after giant 7ft hoodwinker sunfish washes up on a California beach - 12,000 MILES from where it is usually found
— Nico Spalato (@NikeSpalato) March 1, 2019
The fish had only previously be sighted in the Southern Hemisphere
It washed up dead last week at UC Santa Barbara’s Coal Oil Point Reserve pic.twitter.com/Pj6wug7JJT
जवळपास २ किलो वजनाच्या या माशाचं नाव हुडविंकर ठेवण्यात आलं कारण हा मासा स्वत:ला लपवण्यात तरबेज असतो. रिपोर्ट्सनुसार, संशोधकांसाठी हा मोठा प्रश्न आहे की, हा मासा त्याचं घर सोडून जमिनीवर कसा आला? कारण समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी या माशाला १२ हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला.