या लालभडक ओठांमध्ये दडलंय एक रहस्य, बघितल्यावर वाटतं लिपस्टिक लावलेले ओठ पण आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:10 PM2021-09-16T16:10:54+5:302021-09-16T16:12:07+5:30
सेल्फी घेताना पाऊट करणाऱ्या म्हणजेच ओठांचा चंबू करणाऱ्या तरुणी तुम्ही पाहिल्या असतील.मात्र, वरील फोटो मध्ये दिसणारे ओठ कोणा मुलीचे नाहीत तर ते चक्क एका झाडाचं फूल आहे. बसला ना धक्का?
सेल्फी घेताना पाऊट करणाऱ्या म्हणजेच ओठांचा चंबू करणाऱ्या तरुणी तुम्ही पाहिल्या असतील. लिपस्टिक लावुन केलेलं ते पाऊट पाहुन अनेकांना त्या ओठांचा हेवा वाटतो. पण समजा असं पाऊट कोणत्या फुलाने केलं तर. वरील फोटो मध्ये दिसणारे ओठ कोणा मुलीचे नाहीत तर ते चक्क एका झाडाचं फूल आहे. बसला ना धक्का?
या फुलाचं नाव सायकोट्रिया (Psychotria flower) आहे. तसेच या फुलाचं झाड ‘हॉट लिप्स प्लांट’ (Hot lips plant) किंवा ‘हुकर लिप्स’ (Hooker lips plant) या नावानेही ओळखलं जात. या फुलझाडाची उंची कमी असून याची पाने गडद हिरव्या रंगाची असतात. ही फुलं एखाद्या मुलीचनं लाल भडक लिपस्टिक लावलेल्या ओठांप्रमाणे दिसतात. या फुलांच्या या लालचुटुक पाकळ्या फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या असतात. ‘व्हॅलेंटाइन डे’ला या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
या झाडाचे औषधी फायदे आहेत. या झाडामध्ये डायमिथाइल ट्रिप्टामाइन हे रसायन असतं. त्याचा वापर गाठी, वंध्यत्व आणि नपुंसकता यावरील उपचारांमध्ये केला जातो. कित्येक जण याचा वापर इतर आजारांवरही उपचारासाठी पारंपारिक औषध म्हणूनही करतात.
हे फूल उष्णकटिबंधीय भागामध्ये आढळतं. या फुलांची झाडं अत्यंत दुर्मिळ आहेत. हे झाड मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया, इक्वेडोर, कोस्टा रिका आणि पनामा यांसारख्या भागांमध्ये आढळून येते. या फुलांच्या साधारणपणे दोन हजारांहून अधिक प्रजाती आढळून येतात. दुर्दैवाने, मोठ्या प्रमाणात होत झाडांची कत्तल आणि पर्यावरणातील बदलामुळे ही प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच जंगलात लागणारे वणवे, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे याचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.