Island of Dead : 'या' बेटावर जाण्यास सरकारने घातलीय बंदी, कारण वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:01 PM2019-08-21T14:01:38+5:302019-08-21T14:10:48+5:30

आज आम्ही तुम्हाला अशा एका बेटाबाबत सांगणार आहोत, जे सुंदर तर आहेच, पण तरी सुद्धा जगातल्या काही सर्वात धोकादायक बेटामध्ये या बेटाचा समावेश होतो.

Horrifying facts about Poveglia island Italy | Island of Dead : 'या' बेटावर जाण्यास सरकारने घातलीय बंदी, कारण वाचून व्हाल थक्क!

Island of Dead : 'या' बेटावर जाण्यास सरकारने घातलीय बंदी, कारण वाचून व्हाल थक्क!

googlenewsNext

(Image Credit :amazingplanetnews.com)

जगभरात असे अनेक बेटं आहेत जे त्यांच्या नैसर्गिक सुंदरतेसाठी लोकप्रिय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका बेटाबाबत सांगणार आहोत, जे सुंदर तर आहेच, पण तरी सुद्धा जगातल्या काही सर्वात धोकादायक बेटामध्ये या बेटाचा समावेश होतो. इटलीमधील या बेटाला 'Island of Dead' असं म्हटलं जातं.

(Image Credit : Social media)

वेनीसिया लेकच्या उत्तरेला असलेल्या या बेटाचं नाव आहे पोवेग्लिया. इथे जाणे आणि मृत्युला आमंत्रण देणे एकच गोष्ट असल्याचे बोलले जाते. असे म्हणतात की, इथे जाणाऱ्यांसाठी परत येणं कठीण असतं. या बेटाबाबत एका फारच भयावह गोष्ट सांगितले जाते. त्यामुळे लोक इथे जात नाही. तसेच सरकारनेही या ठिकाणावर जाण्यावर बंदी आणली आहे. 

(Image Credit : Social media)

असे म्हटले जाते की, शेकडो वर्षांपूर्वी या बेटावर प्लेगच्या रूग्णांना शेवटच्या घटका मोजण्यासाठी आणून सोडलं जात होतं आणि ज्यांचा मृत्यू व्हायचा त्यांना तिथेच दफन केलं जायचं. असेही म्हणतात की, बेटावर प्लेगच्या रूग्णांची संख्या फारच वाढली होती. अशात जवळपास १ लाख ६० हजार रूग्णांना या बेटावर जिवंत जाळले गेले होते. त्यानंतर या बेटावर भूत-प्रेत असल्याची शंका लोकांमध्ये होती. 

(Image Credit : Social media)

पुढे १९२२ मध्ये या बेटावर मेंटल हॉस्पिटल उभारण्यात आले. पण काही वर्षातच ते सुद्धा बंद करण्यात आले. यामागे कारण सांगितलं जातं की, डॉक्टरांपासून ते रूग्णांपर्यंत सगळ्यांनाच इथे काही विचित्र गोष्टी दिसू लागल्या होत्या.

(Image Credit : Social media)

मेंटल हॉस्पिटल बंद झाल्यानंतर हे बेट अनेक वर्ष बंद होतं. त्यानंतर इटली सरकारने १९६० मध्ये हे बेट एका व्यक्तीला विकलं. असे सांगितले जाते की, असामान्य घटनांसोबत त्या व्यक्तीने इथे परिवारासोबत काही दिवस काढले. नंतर तो बेट सोडून निघून गेला. त्यानंतर आणखी एक व्यक्ती या बेटावर राहण्यासाठी आली होती. त्याच्यासोबतही काही विचित्र घटना घडल्या आणि ती व्यक्ती सुद्धा तिथून पळाली. तेव्हापासून या बेटावर कुणीच आलं नाही.

(Image Credit : Social media)

असे सांगितले जाते की, मासेमारी करणारे लोकही या बेटाजवळ मासे पकडण्यासाठी जात नाहीत.कारण अनेकदा त्यांच्या जाळ्यात मेलेलेच मासे फसतात. 

Web Title: Horrifying facts about Poveglia island Italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.