असं जेल जिथे पोलिसांचं नाही तर कैद्यांचं चालतं राज्य, जगातील सगळ्यात खतरनाक जेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 10:07 AM2023-11-29T10:07:42+5:302023-11-29T10:08:10+5:30

या तुरूंगात कैद्यांचं राज्य आहे. इथे वेगवेगळ्या गॅंग्स असतात. जर दोन गॅंग्समध्ये भांडणं झाली तर दंगली होतात.

Horrifying reality of world's worst jail El Salvador | असं जेल जिथे पोलिसांचं नाही तर कैद्यांचं चालतं राज्य, जगातील सगळ्यात खतरनाक जेल!

असं जेल जिथे पोलिसांचं नाही तर कैद्यांचं चालतं राज्य, जगातील सगळ्यात खतरनाक जेल!

जगात जास्तीत जास्त देशांमध्ये गुन्हेगारांसाठी तुरूंग बनवण्यात आले आहेत. या तुरूंगांमध्ये कैद्यांना ठेवलं जातं. त्यांना शिस्त शिकवली जाते. जगण्याचा नवा मार्ग दाखवला जातो. हेच जर उलगडून सांगायचं तर तुरंग म्हणजे गुन्हेगारांसाठी सुधारगृह आहे. जेव्हा कोर्टात सिद्ध होतं की, एखाद्याने गुन्हा केलाय तर त्याला शिक्षा सुनावली जाते. या शिक्षेदरम्यान कैदी आपल्या गुन्ह्याचं प्रायश्चित करतो.

तुरूंगाला सुधारगृह सुद्धा म्हटलं जातं. पण आज आम्ही तुम्हाला जगातील एका अशा तुरूंगाबाबत सांगणार आहोत, जिथे राहणाऱ्या कैद्यांना सुधरण्यासाठी नाही तर नरकरूपी विश्वात पाठवलं जातं. आम्ही तुम्हाला सांगतोय सेंट्रल अमेरिकेतील एल साल्वाडोर आणि होंडुरस येथील तुरूंगाबाबत. एकीकडे इतर तुरूंगांमध्ये कैद्यांना काहीच मोकळीक नसते. तेच या तुरूंगात फक्त गुन्हेगारांचीच चालते. पोलीस त्यांच्यासमोर घाबरतात आणि शहरातील जास्तीत जास्त गुन्हे या तुरूंगाच्या आतच घडतात.

या तुरूंगात कैद्यांचं राज्य आहे. इथे वेगवेगळ्या गॅंग्स असतात. जर दोन गॅंग्समध्ये भांडणं झाली तर दंगली होतात. इतकंच काय तर एखाद्याचं शिर धडापासून वेगळं करून फुटबॉलही खेळला जातो. जर महिला कैद्यांबाबत सांगायचं तर थोड्या थोड्या वादामुळे त्यांना आगीच्या हवाली केलं जातं. 

या तुरूंगात अनेकदा पोलीस अचानक रेड मारतात. तेव्हा कैद्यांकडून अनेक खतरनाक शस्त्र ताब्यात घेतली जातात. त्याशिवाय तुरूंगात प्लेस्टेशन, स्क्रीन्स, मोबाइल आणि कम्प्युटर सुविधाही वापरतात. ड्रग्स, दारू, सिगारेट या गोष्टी इथे सहजपणे मिळतात आणि इतरांना विकल्या जातात. तुरूंगाच्या आतूनच अनेक गुन्ह्यांचं प्लानिंग केलं जातं. जणू हा गुन्हेगारांचा एक अड्डाच असतो.

Web Title: Horrifying reality of world's worst jail El Salvador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.