हा आहे जगातील सर्वात सुंदर घोडा, किंमत वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 09:12 AM2023-08-26T09:12:47+5:302023-08-26T09:13:57+5:30
Horse Breed Of Akhal Teke: जगात घोड्यांची एक अशी प्रजाती आहे ज्यांना जगातील सगळ्यात सुंदर घोडे मानले जातात. चला जाणून घेऊ या घोड्यांबाबत
Horse Breed Of Akhal Teke: जगात कितीतरी वेगवेगळे प्राणी आहेत. यातील काही प्राणी इतके सुंदर असतात की, त्यांना वेगवेगळ्या उपमा दिल्या जातात. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एक घोडा इतका सुंदर आहे की, त्याला थेट स्वर्गातून आल्याची उपमा दिली गेली. जगात घोड्यांची एक अशी प्रजाती आहे ज्यांना जगातील सगळ्यात सुंदर घोडे मानले जातात. चला जाणून घेऊ या घोड्यांबाबत आणि त्यांच्या प्रजातीबाबत...
घोड्यांच्या या प्रजातीला अखल टेके असं नाव आहे. हे घोडे तुर्कमेनिस्तानच्या कराकुम वाळवंटात राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेके आदिवासी समाजातील लोकांनी हजारो वर्षाआधी अखल मरूस्थलमध्ये घोड्यांच्या या प्रजातींचं पालन-पोषण केलं होतं. त्यामुळे या प्रजातीचं नावही त्यांच्यावरून पडलं. अखल टेके जगातील सगळ्यात जुन्या प्रजातींपैकी एक घोडे आहेत. इतिहासात 3 हजार वर्षापासून यांचा उल्लेख मिळतो. हे घोडे त्यांचा स्पीड, बुद्धी आणि शक्तीसाठी ओळखले जातात. इतकंच नाही तर हे घोडे लांब उडीही घेतात. तसेच त्यांचा रंग चमकदार पांढरा किंवा सोनेरी असतो.
एका मीडिया रिपोर्टनुसार, या एका घोड्याची किंमत भारतात 30 लाख रूपये असू शकते. त्यांचं वजन सरासरी 450 ते 500 असतं. असं म्हटलं जातं की, हे घोडे केवळ त्यांना मालकांनाच सवारी करू देतात. या प्रजातीचे घोडे इतर घोड्यांच्या तुलनेत आपल्या मालकाचं बोलणं लगेच समजतात.
पण दुर्दैवाने आता या घोड्यांची संख्या घटत आहे. एका रिपोर्टनुसार, या तुर्कमेनी घोड्यांची सध्यांची संख्या 7 हजाराच्या आसपास आहे. अखल टेके तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रीय प्राणीही आहेत. येथील लोक हे घोडे पाळतात. वैज्ञानिकांचा दावा आहे की, या घोड्यांच्या आनुवांशिकतेमुळे त्यांची त्वचा चमकदार असते.