65 वर्षांचा पती, 22 वर्षांची पत्नी; 'हॉटेल देत नाही सिंगल बेड असलेली रूम'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:49 PM2023-03-02T13:49:20+5:302023-03-02T13:50:54+5:30
तिचे म्हणणे आहे की, त्यांना दोघांनाही एकच बेड हवा असतो. पण वेगवेगळा बेड दिला जातो.
पत्नीचे वय 22 वर्ष आणि पतीचे वय 65 वर्ष. दोघांच्या वयातील अंतर तब्बल 43 वर्ष. अशा या जोडप्याची एक अजबच कहाणी समोर आली आहे. पत्नीचे म्हणणे आहे की, ती जेव्हा तिच्या पतीसोबत ट्रॅवल करते, तेव्हा त्यांना विचित्र वागणूक मिळते. जेव्हा ते दोघे सोबतच हॉटेलची रूम बुक करतात, तेव्हा त्यांना अशी रूम दिली जाते, जेथे दोघांच्याही झोपण्याची व्यवस्था वेगवेगळी असेल.
तिचे म्हणणे आहे की, त्यांना दोघांनाही एकच बेड हवा असतो. पण वेगवेगळा बेड दिला जातो. हे कपल सोशल मीडियावर 'शादी शाफिक' नावाने एक जॉइंट अकाउंट चालवते. हे दोघे जेव्हा व्हॅकेशनवर जातात, तेव्हा त्यांना कोण-कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना सांगितले आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावर लिहिले आहे, 'जेव्हा आम्ही चेक इन करतो, तेव्हा एकाच ट्विन बेडची मागणी करतो. पण हॉटेल आम्हाला दोन बेड प्रोव्हाइड करते.'
दोघांचीही खिल्ली उडवतायत लोक -
या कपलने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात दोघेही वेगवेगळ्या बेडवर एकमेकांचा हात हातात घेऊन बसलेले दिसत आहेत. या व्हडिओमध्ये संबंधित महिला बोलत असतानाच, तिच्या पतीचा हातही तिच्या हातात दिसत आहे. यानंतर ती त्याचा हात सोडते.
या कपलचा हा व्हडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या विविध प्रकारच्या कमेंटदेखील येत आहेत. एकीकडे काही लोक हॉटेलचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे काही लोक, यांच्या वयातील मोठ्या फरकामुळे यांना दोन बेड दिले जातात, असे म्हणत खिल्ली उडवत आहेत. एका युजरने म्हटले आहे, 'माझे लग्न झाले होते, तेव्हा मी दोन वेगळ्या बेडरूम मांगितल्या होत्या.' आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्यांना आपण बाप-लेक वाटले असाल.'