ड्रग्स डीलरच्या प्रेमात पडली पोलीस महिला, आता तिला फसवून झाला फरार....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 13:01 IST2023-05-02T13:01:01+5:302023-05-02T13:01:34+5:30
Jarahatke : सोबतच जिममध्ये वर्कआउट करतानाचे फोटोही शेअर करत होती. पण तिला आता सस्पेंड करण्यात आलं आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने तिच्या पोस्टचा वापर करून आपल्या ड्रग्स डीलर प्रेमीला पोलिसांपासून वाचवलं.

ड्रग्स डीलरच्या प्रेमात पडली पोलीस महिला, आता तिला फसवून झाला फरार....
Jarahatke : प्रेमात व्यक्ती चूक-बरोबर हे सगळं विसरत असतो. त्यांना फक्त त्यांची पार्टनर आणि त्यांचं जीवन दिसत असतं. पण मुळात अनेकदा त्यांना यात फटका बसतो. सोशल मीडियावर काही दिवसांआधी एका सुंदर पोलीस महिलेचे फोटो व्हायरल झाले होते.
ही पोलीस महिला तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. सोबतच जिममध्ये वर्कआउट करतानाचे फोटोही शेअर करत होती. पण तिला आता सस्पेंड करण्यात आलं आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने तिच्या पोस्टचा वापर करून आपल्या ड्रग्स डीलर प्रेमीला पोलिसांपासून वाचवलं.
आम्ही तुम्हाला सांगतोय न्यूयॉर्क सिटी पोलीस अधिकारी अलिसा बजरकटारेविक हिच्याबाबत. अलिसा काही दिवसांआधीच तिच्या बोल्ड बिकीनी फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. सोशल मीडियावर तिचे अनेक फॅन्स आहेत. पण आता अलिसा तिच्या पर्सनल रिलेशनमुळे अडचणीत सापडली आहे.
अलिसावर आपल्या प्रियकराला पोलिसांपासून वाचवण्याचा आरोप आहे. अलिसाचा प्रियकर एक ड्रग्स डीलर आहे. जेव्हा पोलिसांनी याला पकडलं तेव्हा अलिसाने आपल्या पदाचा फायदा घेत त्याला पोलिसांपासून वाचवलं.
अलिसा या आरोपीला एका जिममध्ये भेटली होती. दोघेही एकाच जिममध्ये वर्कआउट करत होते. अनेक लोकांनी अलिसाला या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. पण तिने काही ऐकलं नाही. असं सांगितलं जात आहे की, जेव्हा इन्वेस्टिगेशन टीमने अलिसाच्या प्रियकराला पकडलं होतं तेव्हा अलिसाने तिथे येऊन आपला बॅच दाखवून चौकशी रोखली होती. नंतर ड्रग्स डीलरला तिथून जाऊ दिलं.