अंतराळात ताऱ्यांचा जन्म कसा होतो ? नासानं दाखवला फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 06:25 PM2021-08-26T18:25:13+5:302021-08-26T18:25:30+5:30

NASA Space Photo: नासाच्या हबल स्पेस टेलीस्कोपनं​ हा फोटो टिपला आहे.

How are stars born in space? Photo shown by NASA | अंतराळात ताऱ्यांचा जन्म कसा होतो ? नासानं दाखवला फोटो...

अंतराळात ताऱ्यांचा जन्म कसा होतो ? नासानं दाखवला फोटो...

googlenewsNext

वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संस्था नासा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अंतराळातील विविध फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. पुन्हा एकदा नासानं अंतराळातील एक चकीत करणारा फोटो शेअर केला आहे. नासाच्या हबल स्पेस टेलीस्कोपनं ताऱ्यांचं असं छायाचित्र टिपलंय, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

नासानं शेअर केलेला हा फोटो ताऱ्यांचा आहे. पण, तुम्ही म्हणाल की, त्यात काय विशेष. विशेष हे की, नासानं शेअर केलेला फोटो ताऱ्यांच्या जन्माचा आहे. आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी विचार आला असेल की, या ताऱ्यांचा जन्म कसा होतो. पण, आता नासानं याचा प्रत्यक्ष फोटो दाखवला आहे. अंतराळातील 'स्टेलर नर्सरी'चं हे चित्र एखाद्या कल्पनेप्रमाणे आहे. अंतराळातील 'स्टेलर नर्सरी' भागात धुळींपासून ताऱ्यांचा जन्म होतो. 

स्टेलर नर्सरीचा फोटो

स्पेस डॉट कॉमच्या बातमीनुसार, नासानं याबाबत सांगताना म्हटलं की, 'स्टेलर नर्सरी' मिथुनच्या नक्षत्रात आहे. हे चित्र तेथूनच घेतलेलं आहे. AFGL 5180 नावाची स्टेलर नर्सरी या चित्रात दिसत आहे. तुम्ही या चित्राच्या मध्यभागी काळजीपूर्वक पहाल, तेव्हा तुम्हाला एक तारा जन्माला येताना दिसेल. चमकदार बेबी स्टार्सचे हे चित्र आश्चर्यकारक आहे.

हबलच्या वाइड फील्ड कॅमराने घेतला फोटो
शास्त्रज्ञांचा असं म्हणण आहे की, ताऱ्यांच्या जन्माची प्रक्रिया समजून घेतल्यास सौर मंडळाबद्दल अधिक समजू शकेल. हे चित्र हबलच्या वाइड फील्ड कॅमेरा 3 (WFC3) मधून घेण्यात आलं आहे. हा कॅमेरा अशीच चित्रे काढण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अॅस्ट्रोनॉमर्स म्हणजेच जन्माला येणाऱ्या नवीन ताऱ्यांचा फोटो घेता येतो.

Web Title: How are stars born in space? Photo shown by NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.