पक्ष्यांना हे जग कसं दिसतं? रिसर्चमधून आलं समोर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 02:19 PM2019-10-23T14:19:53+5:302019-10-23T14:21:15+5:30
अनेकदा लोकांच्या मनात हा विचार येत असेल की, जसे आपण सगळं बघतो, तसंच सर्वांनाच दिसत असेल का? किंवा पृथ्वीवरील इतर जीवांना दुनिया कशी दिसत असेल?
(Image Credit : twistedsifter.com)
अनेकदा लोकांच्या मनात हा विचार येत असेल की, जसे आपण सगळं बघतो, तसंच सर्वांनाच दिसत असेल का? किंवा पृथ्वीवरील इतर जीवांना दुनिया कशी दिसत असेल? खरंतर या प्रश्नांचं उत्तर आता सापडलं आहे. म्हणजे पक्ष्यांना जग कसं दिसतं याचा रिसर्चमधून खुलासा झाला आहे.
ड्रॅगनफ्लाय हे पक्षी त्यांच्या तेज नजरेमुळे गोष्टी स्लोमोशनमध्ये बघतात. साप गरम वस्तुंमधून निघणाऱ्या तरंगांना बघतो. घोडा आणि झेब्रा त्यांच्या डोळ्यांच्या आकारामुळे आजूबाजूच्या गोष्टी सरळ बघू शकतात.
(Image Credit : photographyoftheinvisibleworld.blogspot.com/)
आता वैज्ञानिकांनी एका रिसर्चमधून हे शोधलं आहे की, पक्ष्यांना जग कसं दिसतं. म्हणजे बघा ना...मनुष्य तीन रंगांच्या मदतीने बघतो आणि इतर रंग हे या तीन रंगांपासूनच तयार होतात.
ग्राफमध्ये ही तुलना केली गेली आहे की, मनुष्य आणि पक्षी कोणत्या रंगांना बघू शकतात. मनुष्य लाल, हिरवा आणि निळा रंग बघू शकतात आणि पक्षी लाल, हिरवा, निळा आणि UV रंग बघू शकतात. इथे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, पक्ष्यांच्या ग्राफमध्ये ज्याला UV रंग दाखवला आहे, तो केवळ सांकेतिक आहे. जेणेकरून मनुष्य तो बघू शकतील. अभ्यासानुसार UV Light चा कोणताही रंग नसतो.
(Image Credit : joelsartore.com)
Ornithologist Joe Smith ने सांगितले की, पक्ष्यांच्या रंगांमध्ये रंग ओळखण्याची एक खास क्षमता असते. मनुष्य रंग बघून काहीच जीवांमध्ये लिंगभेदाची ओळख पटवू शकतात. तर पक्षी हे ९२ टक्के जीवांचा लिंग त्यांच्या रंगांवरूनच ओळखतात.