कानात भुणभुण करत चावणारा डास रात्रीच्या अंधारात तुम्हाला कसा शोधतो? रंजक आहे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:36 PM2022-08-23T13:36:41+5:302022-08-23T13:54:40+5:30

तुम्ही कधी हा विचार केलाय का की डास रात्रीच्या अंधारात आपल्याला शोधतात कसं? कशाच्या आधारे ते आपल्यापर्यंत पोहचतात?

how does mosquito find you in night know the truth | कानात भुणभुण करत चावणारा डास रात्रीच्या अंधारात तुम्हाला कसा शोधतो? रंजक आहे उत्तर

कानात भुणभुण करत चावणारा डास रात्रीच्या अंधारात तुम्हाला कसा शोधतो? रंजक आहे उत्तर

Next

डासांच्या चावण्यामुळे प्रत्येकजण हैराण असतो. त्यांचा उपद्रव अगदी कोणालाही जेरीस आणतो. डासांपासून वाचण्यासाठी रात्रीच्या वेळी लोक कुंडले, द्रव पदार्थ, अगरबत्ती यांचा वापर करतात. यानंतरही या डासांवर कोणताही परिणाम होत नाही आणि ते रातोरात आपले रक्त (Blood) शोषून घेतात. पण या सगळ्यात तुम्ही कधी हा विचार केलाय का की डास रात्रीच्या अंधारात आपल्याला शोधतात कसं? कशाच्या आधारे ते आपल्यापर्यंत पोहचतात?

खरी गोष्ट म्हणजे डास आपल्याला चावत नाहीत, तर आपलं रक्त शोषून घेतात. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या आजूबाजूला फिरणारे सर्व डास आपले रक्त पीत नाहीत. आपल्याला चावते ती केवळ मादी डासच असते. ते त्यांच्या अंड्यांचा विकास आणि संगोपन करतात. वास्तविक, अंड्यांसाठी आवश्यक पोषक द्रव्ये मानवी रक्तात आढळतात. त्यामुळे ती आपलं रक्त शोषून घेते ज्याला आपण “डास चावला” असं म्हणतो.

डासांना अंधारात माणूस सापडतो कसा?
यामागचं कारण म्हणजे आपला श्वास. आता तुम्ही विचार करत असाल की कसे?. वास्तविक, जेव्हा मनुष्य श्वास सोडतो तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साईड वायू (CO2) बाहेर पडतो. ह्याचा वास डासांना आपल्याकडे आकर्षित करतो . मादी डासाचे ‘सेन्सिंग ऑर्गन’ बऱ्यापैकी चांगले असतात. याद्वारे कोणताही मादी डास ३० फुटांपेक्षा जास्त अंतरावरून कार्बन डायऑक्साईडचा वास ओळखतो. या कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने ते अंधारातही तुमच्यापर्यंत पोहोचतात. आपल्या शरीरातून रक्त शोषून मादी डास आपल्या अंड्याचे पोषण करा. कार्बन डायऑक्साइड व्यतिरिक्त, डास मानवांपर्यंत पोहोचण्यासाठी शरीरातील उष्णता, गंध आणि घाम यासारख्या इतर सिग्नलचा देखील वापर करतात.

Web Title: how does mosquito find you in night know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.