इजिप्तमधील पिरॅमिड वरून कसे दिसतात? बघून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:14 PM2024-01-31T12:14:27+5:302024-01-31T12:16:02+5:30
Egypt pyramid : जे लोक सामान्यपणे पिरॅमिड बघायला जातात ते त्यांना केवळ समोरून किंवा आतून बघतात. पण आज आम्ही तुम्हाला पिरॅमिड वरून कसं दिसतं हे एका व्हिडिओतून दाखवणार आहोत.
Egypt pyramid : जगातल्या सात आश्चर्यांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा इजिप्तमधील पिरॅमिडचंही नाव येतं. नॅशनल जियोग्राफिकनुसार, इजिप्तचा पहिला राजा खूफू होता. ज्याने पिरॅमिडचं निर्माण केलं होतं. हजारो वर्षाआधी यांचं निर्माण करण्यात आलं होतं. पिरॅमिडच्या निर्माणाबाबत अनेक मान्यता आहे. लोक या गोष्टीने हैराण होतात की, इतके जड दगड इतक्या उंचीवर कसे नेले असतील? जे लोक सामान्यपणे पिरॅमिड बघायला जातात ते त्यांना केवळ समोरून किंवा आतून बघतात. पण आज आम्ही तुम्हाला पिरॅमिड वरून कसं दिसतं हे एका व्हिडिओतून दाखवणार आहोत.
ट्विटर अकाउंट @historyinmemes हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला ज्यात एका व्यक्ती इजिप्तच्या पिरॅमिडवर पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. आजकाल असे अनेक व्हिडीओ ग्राफिक्सच्या मदतीने बनवले जातात. पण हा व्हिडीओ खरा वाटत आहे. हा एक व्हायरल व्हिडीओ आहे. तो खरा असण्याचा दावा आम्ही करत नाही.
Man takes huge risk by parachuting over the pyramids pic.twitter.com/sswmhyU0B0
— Historic Vids (@historyinmemes) January 29, 2024
व्यक्ती एका पॅराशूटने उडत आहे. त्याचा चेहरा दिसत नाही. पण समोर जो नजारा दिसतो तो अवाक् करणारा आहे. समोर इजिप्तचं पिरॅमिड दिसत आहे. वरून पिरॅमिड पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, याला आश्चर्य का म्हटलं जातं? सगळ्यात वर लहान दगड आहेत. खालच्या बाजूला मोठे दगड आहेत. सर्व दगड एकसारखे ठेवण्यात आले आहेत. वरच्या दगडांवर काही निशाण आहेत. जे समजू शकत नाहीत. व्यक्ती त्या दगड्यांच्या एकदम जवळून जातो.
या व्हिडिओला आतापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, कुणीही आधी दाखवलं नाही की, पिरॅमिड वरून कसे दिसतात. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत.