अगरबत्ती कशी तयार केली जाते? फॅक्टरीमधील व्हिडीओमध्ये दिसेल सगळी प्रोसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 04:54 PM2023-11-10T16:54:05+5:302023-11-10T16:54:21+5:30
Agarbatti Viral Video : नुकताच एक व्हिडीओ यावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात अगरबत्ती कशा तयार केल्या जातात हे दाखवण्यात आलं आहे.
How Incense Sticks Made: अगरबत्तीचा वापर आपण सगळेच पूजा करताना करतो. पण ही सुंगधित अगरबत्ती कशी तयार केली जाते हे तुम्हाला माहीत नसेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात अगरबत्ती तयार करण्याची प्रोसेस दाखवण्यात आली आहे. ही प्रोसेस बघून तुमच्या लक्षात येईल की, हे काम किती अवघड आहे.
इंस्टाग्राम अकाउंट @ourcollecti0n वर नेहमीच कारखान्यांमध्ये बनवण्यात येणाऱ्या वस्तूंचे व्हिडीओ अपलोड केले जातात. नुकताच एक व्हिडीओ यावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात अगरबत्ती कशा तयार केल्या जातात हे दाखवण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे सामान्य दिसणारी ही अगरबत्ती बनवण्यासाठी अनेक लोकांचा सहभाग असतो. हे फारच मेहनतीचं काम आहे.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, राखेत मिक्स करून एक पावडरसारखा पदार्थ तयार केला जातो. जे अगरबत्तीच्या काडीवर लावलं जातं. एका मशीनमध्ये काडी टाकली जाते आणि त्यावर पावडर चिकटतं. दुसरीकडून अगरबत्ती बाहेर येत राहते. त्यानंतर काही महिला या अगरबत्ती गोळा करतात आणि उन्हात वाळत टाकतात. त्यानंतर वजन करून त्यांचे बंडल तयार केले जातात. या व्हिडिओला 1 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.