शून्य मोजून दमाल, पण मुंग्या नाही! शास्त्रज्ञांनी या टेक्निकने मोजल्या पृथ्वीवरील मुंग्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:18 PM2022-09-20T19:18:15+5:302022-09-20T19:19:57+5:30
पृथ्वीवर सुमारे 800 दशलक्ष मानव राहतात. पृथ्वीवर किती मुंग्या राहतात? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? शास्त्रज्ञांनी मुंग्यांची संख्या शोधून काढली आहे.
तुम्ही कधी पृथ्वीवर मुंग्यांच्या संख्या किती असेल याबद्दल विचार केला आहे का? पृथ्वीवर किती मुंग्या राहतात? याचा कोणी विचारही केला नसेल असे खात्रीने म्हणता येईल. पण आता शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर असलेल्या मुंग्यांची संख्या शोधून काढली आहे. अंदाजे आकडेही काढले आहेत. संख्या इतकी जास्त आहे की शून्य मोजता मोजता दिवसही निघून जाईल. परंतु ही संख्या मानव किंवा इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा हजारो किंवा लाख पट जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला आहे. त्यांनी केलेल्या मोजणीनुसार, संपूर्ण जगात 20 क्वाड्रिलियन (20 Quadrillion) मुंग्या आहेत. सामान्य भाषेत सांगायचे झाले तर 200 लाख कोटी. जर तुम्हाला संख्या आणि शून्य पहायचे असतील तर स्वतःच हे मोजून पाहा. पृथ्वीवर 20,000,000,000,000,000 मुंग्या आहेत. या मुंग्या मिळून 12 दशलक्ष टन ड्राय कार्बन तयार करतात. इतका कार्बन, पृथ्वीवरील सर्व पक्षी आणि सस्तन प्राणी मिळूनही ते तयार करत नाहीत. ड्राय कार्बनचे वजन पृथ्वीवरील मानवाच्या वजनाच्या एक पंचमांश आहे.
मानव निसर्गाचा समतोल राखतो. बऱ्याच वर्षांपूर्वी, प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ एडवर्ड ओ विल्सन यांनी कीटकांबद्दल सांगितले होते की केवळ लहान जीवच संपूर्ण जगावर राज्य करतात. ते बरोबर आहेत असे दिसते. मुंग्या हा निसर्गाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते जमिनीतील हवेची पातळी राखतात. त्या बियादेखील इकडून तिकडे नेण्याचं काम करतात. त्या अन्न साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
१५,७०० पेक्षा अधिक प्रजाती
मुंग्यांची संख्या आणि त्यांच्याद्वारे तयार झालेल्या ड्राय कार्बनचे प्रमाण तपासल्यास पृथ्वीवर किती हवामान बदल होत आहेत हे कळू शकते. पृथ्वीवर मुंग्यांच्या 15,700 प्रजाती आणि उपप्रजाती आहेत. अशा अनेक प्रजाती आहेत ज्यांच्या प्रजातींना अद्याप कोणतेही नाव दिलेले नाही. त्यांची सामाजिक रचना, परस्पर समन्वय, लयबद्ध पद्धतीने काम करणे आणि एकमेकांची काळजी घेणे अशा अनेक गोष्टी शिकवतात. ते जगभरातील इकोसिस्टम तयार करण्यात आणि संतुलित करण्यात मदत करतात.
पृथ्वीवर किती मुंग्या आहेत हे जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र योग्य पद्धत व पुराव्याअभावी नेमका आकडा कळू शकला नाही. शास्त्रज्ञांनी इंग्रजी नसलेल्या साहित्याचाही अभ्यास केला. स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, मँडरिन आणि पोर्तुगीज भाषेतील कागदपत्रांचाही त्यांनी अभ्यास केला. एकूण, मुंग्यांच्या संख्येवर केलेले 498 अभ्यास वाचल्यानंतर, शास्त्रज्ञांनी या मुंग्यांची गणना केली.
अनेक शास्त्रज्ञ आले एकत्र
हा अभ्यास करण्यासाठी जगभरातील अनेक विद्यापीठे आणि वैज्ञानिक संस्थांचे शास्त्रज्ञ एकत्र आले. कारण मानवी लोकसंख्या सुरक्षित ठेवायची असेल तर मुंग्यांची संख्या जाणून घेणे गरजेचे आहे. कारण मुंग्या मोजून पृथ्वीवर होणारे मोठे हवामान बदल शोधणे सोपे जाते. त्याचे कारण असे आहे की जगभरातील मानवी क्रियाकलापांमुळे कीटकांची संख्या कमी होत आहे. त्याचे वास्तव्य संपुष्टात येत आहे. याचे कारण जमिनीचा योग्य वापर न होणं, रसायनांचा वापर, हवामान बदल हेदेखील आहे.