न धुता एकच अंडरविअर किती दिवस वापरतात पुरूष? रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:22 PM2024-05-10T15:22:14+5:302024-05-10T15:22:56+5:30
जेव्हा विषय कपडे आणि अंडरगारमेंट्सचा असतो तेव्हाही बरेच लोक हायजीनची काळजी घेत नाहीत.
आजकाल बरेच लोक हायजीनची काळजी घेतात. पण तरीही भारतात हायजीनसंबंधी अनेक समस्या आहेत. खाण्या - पिण्यासोबतच बरेच लोक कपड्यांबाबत स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. अशात आज आम्ही तुम्हाला अंडरवेअरच्या हायजीनबाबत सांगणार आहोत.
भारतात स्वच्छतेची एक मोठी समस्या आहे. दुकानदार असो वा सामान्य लोक हायजीनची काळजी घेत नाहीत. जेव्हा विषय कपडे आणि अंडरगारमेंट्सचा असतो तेव्हाही बरेच लोक हायजीनची काळजी घेत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का की, दर 5 पैकी 1 व्यक्ती अशी आहे जे अंडरविअर दोनदा घातल्यावरच धुताता. हा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
एका ऑनलाईन क्लोदिंग रिटेलरने हा रिसर्च केला की, लोक त्यांच्या अंडरविअर किती दिवसांनी किंवा कितीदा वापरल्यावर धुतात. या रिसर्चमधून जे समोर आलं हे फार हैराण करमारं आहे. लोक अंडरविअर धुण्याआधी कमीत कमी दोनदा वापरतात. तसेच रिसर्चनुसार, नेहमीच न धुतलेली अंडरविअर वापरण्यात पुरूष महिलांच्या समोर आहेत. कमीत कमी 31 टक्के लोकांनी हे मान्य केलं की, ते एकच अंडरविअर धुण्याआधी दोनपेक्षा जास्त वेळ वापरतात.
इनरवेअरबाबत 10 टक्के महिलांनी हे मान्य केलं की, त्या इनरवेअर दोनदा वापरतात. तसेच काही पुरूषांनी तर हेही मान्य केलं की, ते अनेकदा अंडविअरचा जास्त दिवस वापर करता यावा म्हणून ती उलटी करूनही वापरतात. तर महिलांनी सांगितलं की, त्या अंडरविअरपेक्षा ब्रा न धुता अनेक दिवस वापरतात. महिला ब्रा न धुता 5 पेक्षा जास्त दिवस वापरतात.